गंमत म्हणून गोळीबार; तरुणांचे नको ते धाडस आले अंगलटी, तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 09:36 IST2023-04-19T09:35:48+5:302023-04-19T09:36:02+5:30

तिघांनी एका फार्म हाऊसवर असताना दारू पिऊन गंमत म्हणून गोळीबार केला

shooting for fun Unwanted courage of the youth was slapped a case was filed against the three | गंमत म्हणून गोळीबार; तरुणांचे नको ते धाडस आले अंगलटी, तिघांवर गुन्हा दाखल

गंमत म्हणून गोळीबार; तरुणांचे नको ते धाडस आले अंगलटी, तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : गंमत म्हणून परवानाधारक पिस्तुलातून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गोळीबार करणे तरुणांच्या अंगलट आले. याप्रकरणी तेजस गोंधळे (वय २९, रा. गोंधळेनगर, हडपसर), अजिंक्य मोडक (वय ३४, रा. फुरसुंगी), चेतन मोरे (वय २४, रा. तुकाई दर्शन) या तिघांविरुद्ध हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवला आहे. 

तेजस, अजिंक्य आणि चेतन सिंहगड परिसरात फिरायला गेले होते. तेथून परतत असताना तिघे जण खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ थांबले. तेथील एका फार्म हाऊसवर दारू पिऊन जेवण केले. त्यानंतर ते नदीपात्राजवळ गेले. तेथे पिस्तुलातून गोळीबार केला. याचा आवाज उपाहारगृहचालक आणि नागरिकांनी ऐकला. त्यांनी हवेली पोलिसांना या घटनेची माहिती दिली. गोंधळे, मोडक, मोरे मोटारीतून निघून गेले. पोलिसांना माेटारीचा क्रमांक मिळाल्यानंतर तातडीने तपास सुरू केला. पिस्तूल बाळगणारा तेजस याच्याकडे शस्त्र परवाना असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शस्त्र परवान्याबाबत सखोल चौकशी केली. सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करून दहशत माजविल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते तपास करत आहेत.

Web Title: shooting for fun Unwanted courage of the youth was slapped a case was filed against the three