'गुड टच, बॅड टच' बाबत माहिती देताना धक्कादायक प्रकार; ११ वर्षांच्या मुलीवर नराधमाकडून अतिप्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 14:35 IST2024-08-26T14:35:16+5:302024-08-26T14:35:44+5:30

आरोपीने खाऊसाठी पैसे देण्याचे सांगून घरात नेऊन अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले

Shocking type of information about 'good touch, bad touch'; 11-year-old girl assaulted by murderer | 'गुड टच, बॅड टच' बाबत माहिती देताना धक्कादायक प्रकार; ११ वर्षांच्या मुलीवर नराधमाकडून अतिप्रसंग

'गुड टच, बॅड टच' बाबत माहिती देताना धक्कादायक प्रकार; ११ वर्षांच्या मुलीवर नराधमाकडून अतिप्रसंग

धायरी: इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेल्या अकरा वर्षांच्या मुलीवर एका विकृत नराधमाकडून खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना खडकवासला येथे घडली आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दिलीप नामदेव मते (वय ६७ वर्षे, रा. खडकवासला) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींच्या सुरक्षिततेसाठी शनिवारी 'गुड टच, बॅड टच' बाबत शाळेतील शिक्षिकांनी मुलींना माहिती दिली. यात पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या अकरा वर्षीय मुलीने स्वतः बाबत शुक्रवारी असा प्रकार झाल्याचे सांगितले. याबाबत शिक्षकांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्या मुलीने आपल्या बाबतीत घडलेली धक्कादायक घटना सांगितली. आरोपीने खाऊसाठी पैसे देण्याचे सांगून घरात नेऊन अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले. शिक्षिका, मुख्याध्यापक यांनी तातडीने याबाबत पालक, शिक्षक संघातील सदस्यांशी चर्चा केली व हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. पालकांच्या तक्रारीवरून या घटनेबाबत हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दिलीप नामदेव मते याला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. पुढील तपास हवेली पोलीस करत आहेत.

Web Title: Shocking type of information about 'good touch, bad touch'; 11-year-old girl assaulted by murderer