कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 12:57 IST2025-05-24T12:56:28+5:302025-05-24T12:57:59+5:30

तुम्ही आमचं काही वाकड करू शकत नाही, आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा असल्याची धमकी हगवणे कुटुंबाने मयुरीला दिली होती

Shocking things have come to light in the complaint filed by Mayuri Jagtap's family to the State Women's Commission. | कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर

कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात हगवणे यांची मोठी सून मयुरी जगताप हिने हगवणे कुटुंबियांवर आरोप केले आहेत. वैष्णवीप्रमाणे हगवणे कुटुंबातील सासरे, नणंद, सासू, दीर यांनी माझ्यावर सुद्धा अत्याचार केले. मला त्यांनी मारहाणही केली असल्याचे मयुरी यांनी सांगितले आहे. या प्रकरणात मयुरीने महिला आयोगाकडे तक्रार केल्याचे सांगितले होते. त्या तक्रारीची दखल तेव्हाच घेतली असती. तर वैष्णवी वाचली असल्याचे मयुरी म्हणाली होती. या तक्रार अर्जाची प्रत आता समोर आली आहे.

मयुरीच्या आई आणि भावाने हा तक्रार अर्ज महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाने आयोगाकडे दिला होता. या अर्जाची चाकणकर यांनी दखल न घेतल्याचे मयुरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यावरून चाकणकर यांच्यावर विरोधकांकडून हल्लाबोल सुरु झाला आहे. या अर्जातून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मयुरीचे सासरे, दीर, सासू, नणंद यांनी धमक्या देत तिला मारहाण केल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. 

अर्जात नेमकं काय नमूद करण्यात आले आहे? 

प्रति अध्यक्षा 
महाराष्ट्र राज्य महिला आयोग 

विषय - आमच्या मुलीला तिच्या सासरवाडीतून होणाऱ्या अत्याचारापासून संरक्षण देणेबाबत 

अर्ज - श्रीमती लता राजेंद्र जगताप (भाऊ)
         कु. मेघराज राजेंद्र जगताप (भाऊ) 

माझी मुलगी सो मयुरी सुशील हगवणे हिचे २० मे २०२२ रोजी श्री सुशील राजेंद्र हगवणे यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर लग्नाच्या काही कालावधीनंतर तिचे सासरे राजेंद्र हगवणे व सासू लता हगवणे यांनी आम्हाला फॉर्च्यूनर पाहिजे व पैसे पाहिजे. अशा मोठ्या गाड्यांच्या रोख रकमेची मागणी करून तिला त्रास देऊ लागले. तिचे पती घरी नसताना वारंवार घटना घडत होत्या. नंतर तिचे सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, दीर शशांक राजेंद्र हगवणे व ननंद करिष्मा हगवणे यांनी तिला मारहाण करत धमकी दिली. तुला वडिल नाहीत. तुझ्या अपंग भावास आईस दोघांना आम्ही मारून टाकू. आमच्याकडे बंदुका आहेत. तुम्ही आमचं काही वाकड करू शकत नाही. माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे. आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे. अशा धमकी देऊन आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा आम्ही घरगुती सामंजस्याने हे वाद मिटवत होतो.

 त्यानंतर १८/२/२०२४ रोजी पौड पोलीस स्टेशन मुळशी येथे तक्रार दाखल केली. परंतु  त्यावेळी तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी समज घेऊन मध्यस्थी केली. त्यानंतर सासू व सासरे तिच्या पतीकडे माझ्या मुलीला सोडल्याची वारंवार मागणी करू लागले. तिच्या पतीचा या गोष्टीला नकार असल्याने त्याचा राग या मुलीवर काढत होते. ६/११/२०२४ रोजी तिचे पती घरी नसताना सासू-सासरे धीर व नणंद यांनी तिला मारहाण केली. तिचे कपडे फाडले. मुलीच्या छातीला सासऱ्याने हात लावला व दिराने मुलीला अवघड जागी लाथ मारली. तुला मुलगा होत नाही तर आमच्याकडे ये ह्या भाषेत मुलीला शिवीगाळ केली. हे सर्व होत असताना मुलीने मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग चालू केले होते. हे कळताच तिचा दीर शशांक हगवणे याने तिचा मोबाईल हिसकावून पळ काढला. रस्त्याच्या दिशेने पळून गेला. मुलगी मोबाईलसाठी त्याच अवस्थेत त्याचा पाठलाग करत होती. ही घटना सदर ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाली आहे. तिच्याकडे कोणालाही संपर्क करायचे साधन नसल्याने हतबल परिस्थितीत पोलिसात तक्रार दाखल करू शकत नव्हती.  ज्याचा फायदा घेत तिच्या सासू आणि नणंद यांनी पोलीस स्टेशनला मुलीची तक्रार दिली. तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अर्जातून करता येऊ शकत नाही ही विनंती आहे की, अर्जाची दखल घेऊन आमच्या मुलीला संरक्षण द्यावे.

Web Title: Shocking things have come to light in the complaint filed by Mayuri Jagtap's family to the State Women's Commission.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.