शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना! १४ मजुरांना डांबून मारहाण, गुऱ्हाळ मालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 20:08 IST

मालकाने गेल्या काही दिवसांपासून् त्यांच्या झोपड्यातून बाहेर पडू दिले नाही, यात लहान मुलगी आजारी असताना तिला उपचारही घेऊ दिले नाहीत

शिरूर/न्हावरे :  शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथे गुऱ्हाळावर ऊस तोडीचे काम करणाऱ्या मजुरांना वेठबिगारी म्हणून राबवण्यात आले. घरी जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर गेल्या काही दिवसापासून डांबून ठेवत बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर लेबर लाईन या समाजिक संस्थेने प्रशासन व पोलिसांच्या मदतीने लहान मुलांसह १४ मजुरांची आज सुटका केली. या प्रकरणी आलेगाव पागा येथील गुऱ्हाळ मालक संदीप 

डुबे यावर वेठबिगारी कामगार, डांबून  ठेवणे, मारहाण आर्थिक फसवणूक व बालकामगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आलेगाव पागा येथील डुबे यांच्या गुऱ्हाळावर छत्रपती संभाजीनगर जिल्हातील पैठण तालुक्यातील ब्रह्मगाव येथील 7 मजूर त्यांच्या मुलांसह ऊस तोडीचे काम करत होते. दोन वर्ष त्यांच्याकडून रात्रंदिवस काम करून घेण्यात आले. त्यांना गावी जाऊ दिले नाही. त्यांच्या वरील आगाऊ उचलीची रक्कम कामातून फिटली असतानाही लाखो रुपये बाकी असल्याचे सांगत गुऱ्हाळ मालक डुबे त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेत होता. तसेच त्यांच्या 6 लहान मुलांकडून गुऱ्हाळ, घोटा तसेच घरातील कामे करून घेत होता. या मजुरांनी घरी जाण्याची मागणी केली असता गेल्या काही दिवसांपासून् त्यांच्या झोपड्यातून त्यांना बाहेर पडण्यास मज्जावं करण्यात आला. यात लहान मुलगी आजारी असताना तिला उपचारही घेऊ दिले नाहीत. अखेर या मजुरापैकी ज्ञानेश्वर साहेबराव चव्हाण याने पुण्यातील लेबर लाईन संस्थेशी संपर्क साधून मदत मागितली. संस्थेने सहानिशा करून आज जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधत मदत मागितली. याची गंभीर दखल घेत जिल्हयाचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी त्वरीत संबधित कामगारांची मुक्तता करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी आलेगाव पागा येथे जाऊन सबंधित कामगारांची सुटका केली. त्यांचे सर्व साहित्य गाडीत भरून त्यांना शिरूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याठिकाणी गुऱ्हाळ मालका विरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर शिरुर तहसिल कार्यालयातून त्यांना सुटकेचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले. सर्व मजुरांना पोलीस संरक्षणात त्यांच्या गावी पोहोचवण्यात आले. 

 

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरCrime Newsगुन्हेगारीcollectorजिल्हाधिकारीPoliceपोलिसEmployeeकर्मचारीMONEYपैसाFamilyपरिवार