पुण्यातील धक्कायदायक घटना; पोलीस चौकीत गोळी झाडून घेत शिपायाने संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 14:08 IST2024-04-05T14:08:00+5:302024-04-05T14:08:23+5:30
कौटुंबिक कारणावरून त्यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे

पुण्यातील धक्कायदायक घटना; पोलीस चौकीत गोळी झाडून घेत शिपायाने संपवलं जीवन
किरण शिंदे
पुणे: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या लोहिया नगर पोलीस चौकी एका कर्मचाऱ्याने स्वतःहून जाणून घेत आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. भारत दत्ता अस्मर असणारे असे गोळ्या झाडून घेतलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. कौटुंबिक वादातून हा सर्व प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याप्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, भारत अस्मर हे पोलीस शिपाई होते. खडक पोलीस ठाण्यात ते नेमणुकीस होते. गुरुवारी रात्रपाळी असल्याने ते कामावर हजर होते. लोहिया नगर पोलीस चौकीत असताना रात्रीच्या सुमारास ते आराम करण्यासाठी म्हणून वर असणाऱ्या खोलीत गेले. यावेळी त्यांच्यासोबत कारबाइन होते. त्यातून त्यांनी चार गोळ्या झाडून घेतल्याचा अंदाज वर्तवला जातोय. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र मागील काही दिवसांपासून ते तणावात होते. कौटुंबिक कारणावरून त्यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.