पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर धक्कादायक घटना; तरुणाने स्वतःला पेटवून घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 13:14 IST2024-02-13T13:13:18+5:302024-02-13T13:14:07+5:30

तरुण ९० टक्के भाजला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Shocking incident in front of Wagholi police station in Pune The young man set himself on fire | पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर धक्कादायक घटना; तरुणाने स्वतःला पेटवून घेतले

पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर धक्कादायक घटना; तरुणाने स्वतःला पेटवून घेतले

पुणे : पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी एका तरुणाने पोलीस चौकी समोर स्वतःला पेटवून घेतले आहे. रोहिदास अशोक जाधव ( वय २८, रा. सिद्धी अपार्टमेंट, डोमखेल रोड, वाघोली ) असे पेटवून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. यामध्ये तरुण ९० टक्के भाजला आहे. त्याला वाघोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अधिक तपास वाघोली पोलीस करत आहेत.  

Web Title: Shocking incident in front of Wagholi police station in Pune The young man set himself on fire