स्वतंत्र महापालिकेसाठी शिवसेनेचे आंदोलन

By Admin | Updated: July 9, 2015 03:07 IST2015-07-09T03:07:10+5:302015-07-09T03:07:10+5:30

पूर्व हवेली भागासाठी स्वतंत्र महापालिका करण्याच्या मागणीसाठी शहर शिवसेनेतर्फे बुधवारी विधानभवन येथे आंदोलन करण्यात आले.

Shivsena movement for independent municipal corporation | स्वतंत्र महापालिकेसाठी शिवसेनेचे आंदोलन

स्वतंत्र महापालिकेसाठी शिवसेनेचे आंदोलन

पुणे : महापालिकेच्या हद्दीत ३४ गावांचा समावेश करण्याचा निर्णय अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. राज्य शासनाने नवीन गावांचा समावेश तातडीने करताना पूर्व हवेली भागासाठी स्वतंत्र महापालिका करण्याच्या मागणीसाठी शहर शिवसेनेतर्फे बुधवारी विधानभवन येथे आंदोलन करण्यात आले.
महापालिका हद्दीत गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. पूर्व हवेलीतील गावे वाघोलीपर्यंत एकत्रित करून नवीन महापालिका करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव यांना दिले. त्या वेळी माजी आमदार महादेव बाबर, शहर संघटक अजय भोसले, श्याम देशपांडे, नगरसेवक प्रशांत बधे, पीएमपी संचालक विजय देशमुख, उपजिल्हा प्रमुख अमोल हरपळे, जिल्हा परिषद सदस्य स्वाती टकले, रोहिणी राऊत, संदीप मोरे, नगरसेविका कल्पना थोरवे, सोनम झेंडे, नीता मंजाळकर, संजय मोरे, धनंजय बेनकर, बापू निंबाळकर आदी उपस्थित होते.

Web Title: Shivsena movement for independent municipal corporation