पुणे महापालिकेत 'महाविकास'  आघाडी : शिवसेनेची काँग्रेस, राष्ट्रवादीला साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 12:09 PM2019-11-22T12:09:30+5:302019-11-22T12:12:08+5:30

राज्यातील नवीन बदलत्या राजकीय समीकरणांची पुण्यात नांदी.

Shiv SenaShivsena supporting to Congress, 'mahavikas aaghadi' in Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेत 'महाविकास'  आघाडी : शिवसेनेची काँग्रेस, राष्ट्रवादीला साथ

पुणे महापालिकेत 'महाविकास'  आघाडी : शिवसेनेची काँग्रेस, राष्ट्रवादीला साथ

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला शिवसेनेच्या नगरसेवकांनी मतदान केले

पुणे :पुणे महापालिकेत सुरू झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत 'महाविकास' आघाडी करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला शिवसेनेच्या नगरसेवकांनी मतदान केले आहे.
   याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यात आणि केंद्रात भाजप - शिवसेना युती तुटली आहे. त्यामुळे अडीच वर्षांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेतही हेच चित्र बघायला मिळत आहे. पुण्यातही शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याचे बघायला मिळाले.


यावेळी शिवसेना गटनेता संजय भोसले यांनी मी पुन्हा येईन, मी येईन यातला 'मी' अडथळा ठरला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करत असल्याचा टोलाही लगावला.
   दरम्यान महापौरपदासाठी भाजपने मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीने प्रकाश कदम यांना उमेदवारी दिली आहे. मात्र 2017साली झालेल्या निवडणुकीनुसार भाजपला निर्विवाद बहुमतानुसार 97 तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 39 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे 10, काँग्रेसचे 9, मनसे 2 आणि इतर 5 अशी नगरसेवक संख्या महापालिकेत असल्याने मोहोळ यांची निवड निश्चित असल्याचे मानले जात आहे.

Web Title: Shiv SenaShivsena supporting to Congress, 'mahavikas aaghadi' in Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.