शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-भाजपमध्ये जागेसाठी रस्सीखेच

By admin | Updated: June 9, 2014 23:22 IST

भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांना विक्रमी 1 लाख 22 हजार मते मिळवून देणा:या कोथरूड विधानसभा मतदारसंघात विधानसभेसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे.

पुणो : लोकसभा निवडणुकीत शहरातील 6 मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांना विक्रमी 1 लाख 22 हजार मते मिळवून देणा:या कोथरूड विधानसभा मतदारसंघात विधानसभेसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. जागावाटपात शिवसेनेच्या वाटय़ाला आलेल्या या मतदारसंघावर आता भाजपच्या पदाधिका:यांनी दावा करण्यास सुरुवात केली असल्याने महायुतीत या जागेवरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. 
गेल्या दशकभरात प्रत्येक निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या पारडय़ात झुकलेल्या  कोथरूड मतदारसंघाने या लोकसभेतही आपला कौल भाजपच्याच पारडय़ात टाकला आहे. मात्र, आता महायुतीला मिळालेल्या या यशाने या मतदारसंघात इच्छुकांची संख्याही वाढलेली आहे. 
त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार चंद्रकांत मोकाटे यांना तिकिटासाठी झगडावे लागणार असल्याचे बोलले जाते. तर, या मतदारसंघातून मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले 
मनसेचे उमेदवार किशोर शिंदे 
यांनीही तयारी सुरू केली असून, राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरेही विधानसभेसाठी बोहल्यावर चढले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून यंदा तिरंगी लढत रंगणार, असे चित्र आहे.
विधानसभेच्या जागावाटपात हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेकडे, तर आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. 2क्क्9मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे 8 हजार मतांनी निवडून आले होते. 
त्या वेळी मनसेकडून प्रथमच निवडणूक लढविणारे अँड. किशोर शिंदे यांना पहिल्याच प्रयत्नात तब्बल 44 हजार मते मिळाली होती. तर, भाजपमधून बंड करून बाहेर पडलेले उज्ज्वल केसकर आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार दीपक मानकर यांना चांगली मते मिळाली होती. तर, राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आलेल्या अण्णा जोशी यांचे चांगलेच पानिपत झाले होते. 
विधानसभेनंतर 2क्12मध्ये झालेल्या   निवडणुकीत या मतदारसंघाने मनसेच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे कोथरूडमध्ये मनसे चांगलीच वाढल्याचे दिसून आले. मात्र, अवघ्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीला या मतदारसंघातून चांगले यश मिळाले आहे. 
या विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 1 लाख 22 हजार मते भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांना मिळाली आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर महायुतीचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मात्र, या विजयामुळे शिवसेनेत तिकिटासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षीय बांधणी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी या मतदारसंघाची जबाबदारी शहरप्रमुख म्हणून श्याम देशपांडे यांच्याकडे देण्यात आली आहे. 
देशपांडे यांनी काही दिवसांपासून आपले वर्चस्व निर्माण केले असून, कार्यकत्र्याकडून त्यांच्या उमेदवारीची मागणी करण्यात येत आहे. तसेच, माजी मंत्री शशिकांत सुतारही पृथ्वीराज सुतारांसाठी आग्रही आहेत.  लोकसभा निवडणुकीतून पुन्हा एकदा ते सक्रिय झाले आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी या तिघांमध्ये तिकिटासाठी स्पर्धा असल्याचे बोलले जात आहे. 
मनसेकडून या वर्षीही या मतदारसंघाची धुरा अॅड. किशोर शिंदे यांच्याकडेच जाण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाची जबाबदारी मनसेने शिंदे यांनाच दिली होती. त्यामुळे शिंदे यांचेच नाव अंतिम मानले जात असले, तरी नगरसेवक राजाभाऊ बराटे, राम बोरकर यांचीही नावे चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी आपली उमेदवारी आधीच अघोषित स्वरूपात जाहीर केली आहे. 
स्थायी समितीच्या अध्यक्षपदी असताना चांदेरे यांनी हे विधानसभेचे गणित डोक्यात ठेवून या मतदारसंघासाठी सुमारे 8क् कोटींच्या निधीची तरतूद केली होती. तसेच, गेल्या वर्षभरापासून ते अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली उमेदवारी दर्शवीत आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून प्रमोद निम्हण, आबासाहेब सुतार हेसुद्धा तिकिटाच्या रागेंत  आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून यंद तिरंगी लढत 
रंगेल. 
शहरातून आम आदमी पक्षास समर्थन देणारा मोठा वर्ग कोथरूड परिसरात आहे. मात्र, त्या वर्गाचा फारसा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला नाही. त्यामुळे या मतदारसंघात ‘आप’ला केवल 6 हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे  लोकसभेच्या निकालाने आणखी भक्कम झालेल्या महायुतीच्या बालेकिल्ल्यात कोण मुसंडी मारणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
 
भाजप-सेनेत जुंपणार 
4या मतदारसंघावर दावा करण्यास भाजपने सुरुवात केली आहे. जागावाटपात ही मागणी करण्यात येणार असल्याचे खासगीत बोलले जाते. तर, शिवसेनेमुळे भाजपला यश मिळाल्याचा दावा करून त्यास शिवसेना पदाधिकारी नकार देत आहेत. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपला ही जागा मिळाल्यास त्यासाठी माजी शहराध्यक्ष प्रा. विकास मठकरी, नगरसेविका मेधा कुलकर्णी, माजी नगरसेवक मुरलीधर मोहोळ तसेच उज्ज्वल केसकरही तिकिटासाठी तयार आहेत.