शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पेरण्याअभावी शिरूरचा शेतकरी धास्तावला

By admin | Updated: July 17, 2014 03:30 IST

पावसाअभावी तालुक्यातील काही गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले असून, पाच गावांमधून टँकरची मागणी आली आहे.

शिरूर : पावसाअभावी तालुक्यातील काही गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले असून, पाच गावांमधून टँकरची मागणी आली आहे. एकीकडे ही परिस्थिती निर्माण होत असताना खरिपाच्या एक टक्काही पेरण्या होऊ न शकल्याने शेतकरी धास्तावल्याचे चित्र आहे. पावसाने अशीच ओढ दिली, तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत.जुलैचा पंधरवडा उलटला, तरी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. मागील वर्षी जुलैअखेर २२५ मि. मी. पावसाची नोंद झाली होती. यात जूनमध्ये १३९, तर जुलैमध्ये ८६ मि. मी. पाऊस झाला होता. या वर्षी जून कोरडा गेला व जुलैदेखील कोरडा जाण्याच्या मार्गावर आहे. ढग जमा होतात आणि वाऱ्याबरोबर निघून जातात, अशी सध्याची परिस्थिती आहे. यामुळे आकाशाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी हतबल झाला आहे.२0१२ मध्येदेखील जून, जुलै महिन्यात पाऊस कमी पडला होता. अवघ्या २१ मि. मी. पावसाची त्या वेळी नोंद झाली होती. एकूण ३२१ मि. मीच. पाऊस झाला होता. परिणामी, तालुक्यातील ११ गावे व १४८ वाड्यावस्त्यांना २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. २0१३-१४ मध्ये जून-जुलैमध्ये पावसाने चांगली सलामी दिली. सप्टेंबरमध्ये तर २८0 मि. मी. पाऊस झाला. एकूण ५५५.२0 मि. मी. पाऊस पडला. यामुळे जून (२0१३) मध्ये टँकर बंद झाले. दरम्यान, या वर्षी पावसाने ओढ दिल्याने सध्या मिडगुलवाडी व मलठण येथे पाण्याचे टँकर सुरू करावे लागले. (वार्ताहर)