शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

शिरूरचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 10:04 IST

शिरूर लोकसभा मतदारसंघात खलबते: वरिष्ठ पातळीवरून गणित बदलण्यासाठी धडपड

दुर्गेश मोरे

पुणे : काही दिवसांपासून शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे हे भाजपच्या वाटेवर जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याला त्यांच्या देहबोलीवरून पुष्टीही मिळत आहे. राजकीय परिस्थितीही तशीच निर्माण होऊ लागली आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत कुरघोड्यांमुळे वैतागलेल्या खासदारांना कमळाने अलगदपणे गळाला लावले आहे. येत्या काही दिवसांत हेच घड्याळ कमळाबाईंच्या घरात स्थिरावणार असल्याची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यातील सख्य तर सर्वांना माहीतच आहे. आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागल्यामुळे आढळराव-पाटील यांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील विविध प्रश्न तडीस लावण्याबरोबरच धार्मिक कार्यक्रम हाती घेतले आहे. त्यातच राज्यातील सत्तांतर हे आढळराव पाटील यांच्या पत्त्यावर पडले आहे. कारण त्यांनी थेट शिवबंधन काढून शिंदे गटात सहभागी झाले आहेत. गती न मिळालेल्या प्रकल्पांनाही त्यांनी गती देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर दुसरीकडे डॉ. कोल्हे हे मतदारसंघात हजर राहत नसल्यामुळे लोकांची, विशेष करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नाराजी वाढू लागली आहे. काही दिवसांपूर्वी पोदेवाडी गावच्या विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी कोल्हे गैरहजर राहिल्याने माजी सरपंच अनिल वाळुंज यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर कोल्हेंनी डागडुजी केली. पण कितपत त्यात यश मिळेल हे समजेलच. आजही तशीच काहीशी परिस्थिती होती. पण अचानकपणे त्यांनी मतदारसंघातील रस्त्यांच्या खड्ड्यांबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन झाडाझडती घेतली अन् वातावरण बदलले.

राष्ट्रवादी काँग्रेसला ठराविक अंतरावर ठेवण्याबरोबरच तिकडे कामांच्या माध्यमातून म्हणा किंवा चित्रपटाच्या निमित्ताने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी डॉ. कोल्हेंची जवळीकता वाढल्याचे स्पष्टच झाले आहे. गेल्या आठवड्यात शिर्डीला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंथन शिबिर झाले. त्यावेळी त्यांनी आजारपणाचे कारण सांगून उपस्थिती टाळली. केवळ हे पहिल्यांदाच घडले असे नाही. काही दिवसांपासून अनेक वेळा हे चित्र पाहायला मिळाले आहे. जरी चित्रपटाच्या कामात व्यक्त असल्याचे सांगत असले तरी घड्याळातील सेलची पॉवर कमी होत चालल्याचेही त्यांनी दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे भाजपने बारामती मिशन सुरू केले आहे. त्याच काळात शिरूरचे घड्याळ अलगदपणे गळाला लागत आहे म्हटल्यावर गोडधोडचा बेत तर होणारच.

भाजपच्या सर्व्हेत कोल्हेंनाच पसंती

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. ज्या मतदारसंघात भाजपला यश मिळवता आले नाही, त्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. बारामतीमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांचे दौरे सुरू आहेत, तर तिकडे डॉ. कोल्हेंची जवळीकता वाढल्याने शिरूर लोकसभेचाही सर्व्हे केला. तो एकदा नाही तर दोनदा. त्यामध्ये मात्र, मतदारसंघात खासदार डॉ. अमोल कोल्हेंनाच लोकांनी पसंती दिल्याचे भाजपच्या गोटातील नेत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. खेड आणि आंबेगावमध्ये संमिश्र परिस्थिती असली तरी तेथेही बदल होण्यासाठी फार वेळ लागू शकत नाही.

लोकप्रियताच ठरतेय घातक

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे डॉ. कोल्हे घराघरात पोहोचले. शिवाय त्यांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वामुळे लोकांनी स्वत: पैसे गोळा करून निवडणुकीत निधी उभा केला होता. त्यांची लोकप्रियता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पत्त्यावर पडली. कारण त्यांनी त्या कालावधीत शिवस्वराज्य यात्रा काढून १०० मतदारसंघ पिंजून काढण्याबरोबरच स्टार प्रचारक म्हणून गणले जावू लागले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही जवळीकता वाढली. पक्ष हिताच्या प्रत्येक निर्णयात त्यांना सामावून घेण्यात येऊ लागले. इतकेच नाही, तर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांत स्थानिक नेत्यांएवजी कोल्हेंचीच लोकप्रियता अधिक असल्याचे वेळोवेळी दिसून आले. यापूर्वी प्रत्येक कार्यक्रमांचे त्यांना निमंत्रण दिले जात होते. ते त्या ठिकाणी गेले की तेथील लोक थेट कोल्हेंच्या संपर्कात येत होते. त्यांच्याबरोबर सेल्फीही घेत होते. त्यामुळे स्थानिक नेते मंडळींचे भवितव्य झाकून जात होते. त्याचाच फटका आता त्यांना बसू लागला आहे. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीच्या मूळ नेतेमंडळींना आपले प्राबल्य कमी होत चालल्याची जाणीव सुरू झाल्यानेच कोल्हेंची पॉवर कमी करण्यास सुुरुवात केल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे आयत्या वेळच्या निमंत्रणाने उपस्थितीला आपोआपच ब्रेक लागला जातोय.

कोल्हे-आढळरावांमध्ये दिलजमाई

डॉ. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात टोकाचे मतभेद आहेत. आढळराव पाटील यांनी आगामी निवडणुकीत उतरण्यासाठी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. तिकडे भाजपच्या वरिष्ठ फळीतील नेत्यांशी कोल्हेंची गुफ्तगू सुरू आहे. शिरूरमधील कोल्हेंची कामे मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. शिवाय दिल्ली दरबारीही कोल्हेंचे वजन वाढले गेले आहे. त्यामुळे काही दिवसांत कोल्हे भाजपमध्ये दाखल होणार असल्याची स्थिती आहेच. पण त्याअगोदार आढळरावांचे पुर्नवसन कसे करायचे, यावर खलबते सुरू झाले आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार शिरूर लोकसभा मतदारसंघ भाजपकडे असेल. त्यामुळे आगामी सहा -सात महिन्यांत कोल्हे-आढळरावांमध्ये दिलजमाई करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्याची राजकीय पटलावर चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :BJPभाजपाDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेAmit Shahअमित शाहDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShirurशिरुर