शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ स्थायी समितीचे राजकारण शिगेला

By admin | Updated: April 14, 2015 01:36 IST

विद्यापीठातील स्थायी समितीमधील दोन गटांमधील राजकारण चांगलेच तापले असून, आमच्याच गटातील उमेदवाराची नियुक्ती व्यवस्थापन परिषदेवर करावी; अन्यथा पुढील आठवड्यात आंदोलन केले जाईल,

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्याच्या नियुक्तीसाठी विद्यापीठातील स्थायी समितीमधील दोन गटांमधील राजकारण चांगलेच तापले असून, आमच्याच गटातील उमेदवाराची नियुक्ती व्यवस्थापन परिषदेवर करावी; अन्यथा पुढील आठवड्यात आंदोलन केले जाईल, अशी भूमिका विद्यापीठाच्या अधिकार मंडळातील काही ज्येष्ठ सदस्यांनी सोमवारी घेतली आहे. तसेच याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्याशी चर्चा केली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी गेल्या आठवड्यात समितीची बैठक अचानकपणे रद्द केली. परंतु, नियोजित बैठक रद्द करता येणार नाही. त्यामुळे या बैठकीला उपस्थित असलेल्या सदस्यांनी संताप व्यक्त केला. तसेच, उपस्थित सदस्यांनी अध्यक्षांच्या अनुपस्थितीत बैठक घेऊन अहमदनगर येथील दोन व्यक्तींची व्यवस्थापन परिषद आणि अधिसभेवर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. आता हाच निर्णय कायम ठेवावा, अशी भूमिका स्थायी समितीतील सुमारे आठ ते नऊ सदस्यांनी घेतली आहे. त्याचप्रमाणे येत्या १५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेली स्थायी समितीची नियोजित बैठकही रद्द करण्याची मागणी केली आहे. ज्येष्ठ अधिसभा सदस्य डॉ. गजानन एकबोटे, राजेंद्र विखे पाटील, अशोक सावंत, शर्मिला चौधरी, अशोक चासकर आदींनी सोमवारी कुलगुरू डॉ. गाडे यांच्याशी याबाबत चर्चा केली.नाशिक येथील एका प्राचार्यांची नियुक्ती व्यवस्थापन परिषदेवर करावी, अशी स्थायी समितीमध्ये कमी संख्याबळ असलेल्या गटाची मागणी आहे. तर नाशिक येथील एका महिला प्राचार्यांची नियुक्ती या पदावर करावी, असी आठपेक्षा जास्त संख्याबळ असलेल्या गटाची मागणी आहे. परंतु, ऐन वेळी संख्याबळ कमी होऊ नये म्हणून अध्यक्षांच्या अनुपस्थितीत केलेल्या व्यक्तींच्या नियुक्तीला मंजुरी द्यावी, अशी भूमिका विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या ज्येष्ठ सदस्यांनी घेतली आहे.स्थायी समितीचे सदस्य राजेंद्र विखे पाटील म्हणाले, स्थायी समितीच्या अध्यक्षांनी अचानकपणे मनमानी पद्धतीने समितीची बैठक रद्द केली. परंतु, उपस्थित सदस्यांनी बैठक घेऊन ज्या व्यक्तींची निवड व्यवस्थापन परिषदेवर केली. त्यास विद्यापीठाने मान्यता द्यावी, अशी मागणी समितीच्या सदस्यांनी सोमवारी कुलगुरूंकडे केली. तसेच, नियुक्तीस मान्यतादिली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही दिला.स्थायी समितीच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या अनुपस्थितीत बैठक घेऊन दोन व्यक्तींची नियुक्ती विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर केली आहे. परंतु, या संदर्भातील कायदेशीर बाबी तपासून मगच या नियुक्त्यांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.- डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ