शहरं
Join us  
Trending Stories
1
टेरिफविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर अमेरिका संपली...; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भीती
2
“राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय, सत्तेसाठी भाजप+एमआयएम अकोट पॅटर्न”; ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका
3
अमेरिकेने व्हेनेझुएलावर अज्ञात शस्त्र वापरले, मादुरोंचा गार्ड म्हणाला, "नाक-तोंडातून रक्त येत होतं आणि..."
4
IMPS द्वारे पैसे पाठवणं महागणार; 'या' दिग्गज सरकारी बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिला मोठा झटका
5
इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार...
6
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
7
प्रसिद्ध हॉलिवूड स्टारने व्यक्त केली शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा; म्हणाला, 'त्याने मला...'
8
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
10
२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
11
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
12
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
13
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
14
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
15
एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार
16
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
17
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
19
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
20
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

तिने पहिलं लग्न लपवून दुसरे ‘लव्ह मॅरेज’ केले ; न्यायालयाने ते रद्द केले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 12:40 IST

विशेष म्हणजे पहिले लग्न लपवून तिच्या आई वडिलांनीच मोठ्या धुमधडाक्यात तिचे दुसरे लग्न लावून दिले होते. 

ठळक मुद्देफेसबूकवरून झाली होती मैत्री 

पुणे : घरच्यांनी मनाच्या विरोधात तिचे लग्न लावून दिले. मात्र, लग्नाच्या काही महिन्यांनतर तिने फेसबुकवरील एका मित्राशी लव्ह मॅरेज केले. पण आधीच्या पतीबरोबर घटस्फोट न घेता केलेले दुसरे लग्न न्यायालयाने रद्द ठरविले.कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. नाईकवडे यांनी हा निकाल दिला. विशेष म्हणजे पहिले लग्न लपवून तिच्या आई वडिलांनीच मोठ्या धुमधडाक्यात तिचे दुसरे लग्न लावून दिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा आणि सुभाष (नावे बदललेली) यांचे डिसेंबर २०१७ साली लग्न झाले होते. परंतु, रेखा हिने तिचे आधी झालेले लग्न सुभाषपासून लपवले होते. रेखा हिचे तिच्या कुटुंबियांनी अरेंज मॅरेज केले होते. लग्नाच्या काही महिन्यांतर तिची सुभाष यांच्याशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी २०१७ साली लग्न केले. मात्र या सर्वांची रेखाच्या पहिल्या पतीला कल्पनाही नव्हती.  त्याला ही सर्व माहिती मिळाल्यानंतर त्याने थेट सुभाषला गाठले आणि सर्व प्रकार सांगितला. आईला भेटायच्या नावाखाली ती दोन ते तीन आठवडे पुण्यात सुभाष यांच्याकडे राहिली. याबाबत सुभाष यांनी रेखाच्या कुटुंबियांना जाब विचारला असता त्यांना मारहाण करण्यात आली. याबाबत त्याने पोलिसांत तक्रार देखील दिली आहे. तसेच तिला नांदवावे यासाठी सुभाष यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.         याबाबत सुभाष यांनी अ‍ॅड. पुष्कर पाटील यांच्यामार्फेत कौटुंबिक न्यायालयात लग्न रद्द करण्यासाठी दावा दाखल केला होता. पहिल्या लग्नाची माहिती लपवून रेखा हिने सुभाष यांच्याशी केलेले लग्न बेकायदेशीर ठरवत रद्द करण्याचा निर्णय दिला. सोशलमाध्यमांद्वारे त्यांचे लग्न झाले. त्यात तक्रारदार यांची फसवणूक झाली आहे. मात्र त्यांच्यावर एक लग्न झाल्याची शिक्का लागला आहे. ही मानसिकता बदलने गरजेचे आहे, असे अ‍ॅड. पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नfraudधोकेबाजीPoliceपोलिसCourtन्यायालय