शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

शारदा-गणेशाची आभूषणे चोरणारा सापडला

By admin | Updated: July 10, 2015 02:44 IST

अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाच्या मूर्तीवरील ४४ लाखांची आभूषणे लंपास करणाऱ्या चोरट्याला शिवाजीनगर न्यायालयातील पोलिसांनी गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास पकडले.

पुणे : अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाच्या मूर्तीवरील ४४ लाखांची आभूषणे लंपास करणाऱ्या चोरट्याला शिवाजीनगर न्यायालयातील पोलिसांनी गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास पकडले. न्यायालयामधील एका इमारतीमध्ये नळ चोरत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला पकडले. मंदिरात चोरी करणारा हाच चोरटा असल्याचे लक्षात आल्याबरोबर त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, आरोपीच्या वडिलांनी गुरुवारी सकाळी कोथरूड पोलीस ठाण्यात चोरीच्या दागिन्यांपैकी काही दागिने स्वत: आणून जमा केले. तानाजी नारायण कुडले (वय ३५, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) असे अटक आरोपीचे नाव आहे. शिवाजीनगर न्यायालय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल मंडई मंडळाच्या मंदिरामध्ये दागिन्यांची चोरी झाल्याची माहिती मिळाल्यावर न्यायालयातील पोलिसांनीही खबऱ्यांकडून माहिती घ्यायला सुरुवात केली होती. न्यायालयातील पोलीस कर्मचारी संजय असवले, मयूर भोकरे, प्रशांत पालांडे, प्रताप बिरंजे, अनंत ढवळे, प्रफुल्ल साबळे हे न्यायालयाच्या  गेट क्रमांक एक समोरील इमारतीमध्ये गस्त घालीत होते. इमारतीच्या छतावर एका ठिकाणी कुडले नळ चोरत असल्याचे त्यांना दिसले. त्याचे निरीक्षक केले असता सीसीटीव्ही फुटेज आणि रेखाचित्रमधील आरोपी हाच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने निरीक्षक सचिन सावंत यांना माहिती दिली. सावंत, असवले यांनी त्याला विश्रमबाग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. कुडले हा पुर्वी न्यायालयामध्ये प्लंबिंगची तसेच साफसफाईची कामे करीत होता. त्याला विविध प्रकारची व्यसने आहेत. आईवडील, पत्नी आणि मुलांसह तो राहतो. त्याची पत्नी धुण्याभांड्याची कामे करते तर वडील रिक्षाचालक आहेत. सध्या तो काम करीत नसून भुरट्या चो-या करीत असल्याची माहिती विश्रमबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत भट यांनी दिली.