शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: नेतृत्वाच्या सूचनेशिवाय कर्मचारी कशाला बँक उघडतील; शरद पवारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 10:55 IST

रात्री बारा वाजता एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते याचा अर्थ काय समजायचा समजून घ्यावा

पुणे: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला असून,आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चर्चेत आली आहे.बारामती शहरातील आमराई भागातील जिल्हा बँक रात्री तब्बल ११ वाजेपर्यंत सुरु होती.या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर माळेगाव कारखान्याशी संबंधित मतदार याद्या आणि पैशांच्या वाटपाचं प्लॅनिंग केलेली कागदपत्रे मिळून आल्याने खळबळ माजलेली दिसत होती. यावरून आता शरद पवारांनी सवाल उपस्थित करत सरकाराव टीका केली आहे. बँक कशी उघडी राहते? असं म्हणत नेतृत्वाच्या सूचनेशिवाय असं होणार नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. 

शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुक झाली होती. त्यावेळी देखील जिल्हा बँक उघडलेली होती. तेव्हा रात्री बारापर्यंत बँक उघडी होती. आताही तसंच घडलं आहे, बँक कशी उघडी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ज्यांच्याकडे नेतृत्व आहे. त्यांच्या सूचना असल्याशिवाय कर्मचारी कशाला बँक उघडतील. रात्री बारा वाजता एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते याचा अर्थ काय समजायचा समजून घ्यावा असा टोलाही त्यांनी लगावला आहे. दरम्यान  सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख नेते रंजनकुमार तावरे यांनी अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांच्यावर आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारी घटनास्थळी उपस्थित असल्याचा दावा केला आहे. सुनील मुसळे हे आमच्या समोरून गाडीतून गेले. अकरा वाजता जिल्हा बँकेत त्यांचं नेमकं काय काम होतं..? असा सवाल उपस्थित करत माळेगावच्या निवडणुकीत वाटपासाठी पैशांची पाकीटं भरण्याचं काम इथे सुरु होते, असा दावा त्यांनी केला आहे. 

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक बाबत आम्ही काही अजून काही ठरवलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. साधारपणे 3 महिन्यात निवडणूक लागेल. आम्ही अजून चर्चा केली नाही. आम्ही काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना आणि आम्ही स्वतः आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्रित बसून निर्णय घेणार आहोत. पण निवडणूक एकत्र लढण्याची इच्छा असल्याचे पवारांनी सांगितले आहे.  

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवारbankबँक