शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

"मनावर दगड ठेवला अन् शिंदेंना मुख्यमंत्री केले"; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर पवारांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 15:29 IST

रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही पवारांची टीका...

पुणे: चंद्रकांत पाटलांनी दगड डोक्यावर ठेवला का छातीवर ठेवला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. यापूर्वी चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केले आहे. हा दिल्लीमधून आदेश आला. त्याबद्दल बोलताना पवारांनी भाजपला चिमटे काढले. आज पुण्यात एका कार्यक्रमाप्रसंगी पवारांनी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदेंच्या तत्कालिन सुरक्षेविषयावरही भाष्य केले.

पवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवण्याबद्दलची वस्तुस्थिती मला माहिती नाही. सुरक्षा कोणाला कशी आणि किती द्यायची हे कॅबिनेट आखत नाही. याबद्दल कॅबिनेटमध्ये चर्चा होत नाही. याबद्दल चर्चा करण्यासाठी मुख्य सचिव, गृहसचिव या वरिष्ठ लोकांची कमिटी असते. आज मी सकाळी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटलो. त्यांनी मला स्पष्ट सांगितले की एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा होती. तसंच त्यांच्याकडे गडचिरोलीचा पदभार असल्याकारणाने अतिरिक्त फोर्स त्यांना देण्यात आला होता. यामुळे मला असं वाटतं याबद्दल अधिक चर्चा करण्याची गरज नाही, अंसही पवार म्हणाले.

राज्यात नवे राज्य सरकार आले आहे. त्यामधे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्रे फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. राज्यात नवीन सरकार सत्तेवर येऊन चार आठवडे झाले आहेत परंतु अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावर बोलताना पवार म्हणाले, राज्यातील सत्ता या दोघांनी चालवायचं ठरवलेलं दिसतेय. त्यांना राज्यातल्या सहकाऱ्यांची आणि केंद्रातल्या नेतृत्वांची दोघांचीही सहमती आहे. ते सत्ताधारी आहेत त्यामुळे ते जे करतील ते आपल्याला स्वीकारावा लागेल.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवारBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस