शरद पवारांनी रात्रीच फिरवली सूत्र; मणिपूरच्या दंगलीत जतच्या विद्यार्थ्यांना मिळाले 'छत्र'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 03:04 PM2023-05-05T15:04:01+5:302023-05-05T15:17:56+5:30

शरद पवार यांनी मनीपुर चे राज्यपाल यांना फोन करून संबंधित मुलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी सांगितले

Sharad Pawar changed the formula at night Jat students got protection | शरद पवारांनी रात्रीच फिरवली सूत्र; मणिपूरच्या दंगलीत जतच्या विद्यार्थ्यांना मिळाले 'छत्र'

शरद पवारांनी रात्रीच फिरवली सूत्र; मणिपूरच्या दंगलीत जतच्या विद्यार्थ्यांना मिळाले 'छत्र'

googlenewsNext

बारामती: मणिपुर मध्ये दोन समाजाच्या दंगलीत सापडलेल्या जत (जि.सांगली) येथील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एका रात्रीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सूत्र फिरविली. त्यानंतर मध्यरात्रीच या विद्यार्थ्यांना मिल्ट्रीने संरक्षण पुरवत सुरक्षित स्थळी हलविली. संबंधित विद्यार्थ्याच्या वडीलांनी ओळखीतून बारामतीच्या शेतकऱ्यांकडे मदतीची याचना केली होती. त्यानंतर ही सुत्रे हलविण्यात आली.

मळद (ता.बारामती) येथील शेतकरी आणि आॅरगॅनीक अ‍ॅन्ड रेस्युड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) सचिव प्रल्हाद वरे यांना गुरुवारी(दि ४)  सायंकाळी  वाजता मोर्फा चे सभासद संभाजी कोडग (रा.आवंडी, ता. जत, जि. सांगली ) यांचा फोन आला.त्यांनी त्यांचा  मुलगा ‘आयआयआयटी’ इन्फाळ, मनिपूर येथे शिक्षणासाठी आहे.  तो त्याचे महाराष्ट्रातील दहा, इतर राज्यातील दोन असे बारा मित्रांसह होस्टेलमध्ये आहे. होस्टेल शेजारी व मनीपुर मध्ये ठिकठिकाणी दोन समाजात जातीय दंगल मोठ्या प्रमाणावर चालु आहे. यामध्ये होस्टेलच्या चोहोबाजूंनी बॉम्बस्फोट व गोळीबार चालू होता. तेथे विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी लष्कर अगर पोलीस खात्यातील कोणीही नव्हते. या भयंकर परिस्थिती काहीही करा, पंरतु माझ्या मुलाला व त्याच्या मित्रांना वाचविण्यासाठी प्रयत्न करा, अशी विनवणी कोडग यांनी वरे यांना केली. तसेच कोडग म्हणाले, मला मुलाने त्याचा हा कदाचीत शेवटचा फोन असेल, परत फोन करण्यासाठी जिवंत राहतो की नाही, अशा शब्दात तेथील प्रसंगाचे गांभीर्य सांगितल्याचे कोडग यांनी सांगितले.

त्यावर वरे यांनी शुक्रवारी(दि ५) सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे जाऊ, असे सांगत मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. परंतु कोडग यांनी, एवढा पण वेळ नाही कधीही होस्टेलवर हल्ला होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली. त्यावर प्रसंगाचे गांभीर्य ओळखुन वरे यांनी पवार यांचे स्वीय सहायक सतीश राऊत, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे स्वीय सहायक गजानन पाटील सुप्रिया सुळे यांचे स्वीय सहायक मयुर जगताप यांचे नंबर त्यांना दिले. कोडग यांनी तातडीने राऊत यांच्याशी संपर्क साधला. राऊत यांना संबंधित मुलांना आलेली अडचण सांगितली. तेव्हा ज्येष्ठ नेते पवार यांनी मनीपुर चे राज्यपाल यांना फोन करून संबंधित मुलांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी सांगितले.

 पवार यांनी राज्यपाल यांना कळविल्या मुळे वेगवान सुत्रे हलली. रात्री बारा वाजता मनीपुर मिल्ट्रीचे चिफ कमांडर यांनी कोडग यांचा मुलगा मयुर कोडग यासं संपर्क साधला. काही काळजी करू नका, सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी लवकरच येत असल्याचे कळविले. तसे त्यांनी सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवले. पवार साहेब, यांच्या मुळेच कोडग आणि इतर  मुलांना जीवनदान मिळाल्याचे मळद येथील वरे यांनी सांगितले.

Web Title: Sharad Pawar changed the formula at night Jat students got protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.