अवकाळीमुळे पुणे जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान; तातडीने पंचनाम्यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:09 IST2026-03-20T13:09:34+5:302026-03-20T13:09:58+5:30

जोरदार वारा आणि काही ठिकाणी गारपिटीसह झालेल्या पावसामुळे काढणीस आलेला गहू, ज्वारी यांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे

Severe weather causes major damage to agriculture in Pune district; Deputy Chief Minister Sunetra Pawar directs immediate Panchnama | अवकाळीमुळे पुणे जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान; तातडीने पंचनाम्यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

अवकाळीमुळे पुणे जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान; तातडीने पंचनाम्यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

बारामती : पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दूरध्वनीवरून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी संपर्क साधून नुकसानाची सविस्तर माहिती घेत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, जोरदार वारा आणि काही ठिकाणी गारपिटीसह झालेल्या पावसामुळे काढणीस आलेला गहू, ज्वारी यांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आंब्याचा मोहर गळून पडला असून द्राक्षबागांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या परिस्थितीत नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

 

Web Title : बेमौसम बारिश से पुणे जिले में फसलों को नुकसान; तत्काल आकलन का आदेश

Web Summary : पुणे जिले में बेमौसम बारिश से फसलों को भारी नुकसान हुआ। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ने तत्काल नुकसान का आकलन करने का निर्देश दिया। गेहूं, ज्वार, अंगूर और आम की फसलों को नुकसान हुआ। उन्होंने किसानों को तत्काल सहायता सुनिश्चित करने पर जोर दिया।

Web Title : Pune District Crop Damage Due to Unseasonal Rain; Immediate Assessment Ordered

Web Summary : Unseasonal rains caused significant crop damage in Pune district. Deputy Chief Minister Sunetra Pawar directed immediate assessment of losses. Wheat, jowar, grapes, and mango crops suffered. Prompt assistance to farmers is crucial, she emphasized.