Pune | शिवाजीनगर-पुणे विद्यापीठ रस्त्यावर भरधाव कारचालकाने सात वाहनांना उडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 09:46 IST2023-02-02T09:45:14+5:302023-02-02T09:46:08+5:30

या घटनेत तीन ते चार व्यक्ती जखमी झाल्याची माहिती...

Seven vehicles were blown up by a speeding driver on the Shivajinagar-Pune University road | Pune | शिवाजीनगर-पुणे विद्यापीठ रस्त्यावर भरधाव कारचालकाने सात वाहनांना उडवले

Pune | शिवाजीनगर-पुणे विद्यापीठ रस्त्यावर भरधाव कारचालकाने सात वाहनांना उडवले

पुणे : शिवाजीनगर-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावर एलआयसी ऑफिससमोर एका भरधाव माेटार चालकाने सहा ते सात वाहनांना धडक दिली. या घटनेत तीन ते चार व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात माेटारचालक योगेश नवाळे (वय २५, रा. पठारे वस्ती, खराडी बायपास) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याेगेश नवाळे हा मद्यप्राशन करून माेटार चालवित असल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातामुळे काही वेळ रस्त्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Seven vehicles were blown up by a speeding driver on the Shivajinagar-Pune University road