सात हजार रुपयांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:08 IST2021-04-19T04:08:55+5:302021-04-19T04:08:55+5:30

हॉटेलच्या कडेला असलेल्या एका खोलीमध्ये एक इसम देशी विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ...

Seven thousand rupees worth of liquor confiscated | सात हजार रुपयांची दारू जप्त

सात हजार रुपयांची दारू जप्त

हॉटेलच्या कडेला असलेल्या एका खोलीमध्ये एक इसम देशी विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना मिळाली. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर, पोलीस हवालदार काशिनाथ गरुड, आजिनाथ शिंदे, पोलीस शिपाई विकास मोरे यांनी करंदी फाटा येथील हॉटेल किनाराच्या कडेला जाऊन तेथील खोलीमध्ये छापा टाकला असता त्यांना त्या ठिकाणी एक इसम जवळ दारूचे बॉक्स घेऊन बसलेला दिसून आले. त्याच्या जवळील तब्बल एक लाख सात हजार रुपये किमतीच्या २८८९ बाटल्या जप्त केल्या. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई विकास बाळासाहेब मोरे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी मंगेश बाळासाहेब ढोकले (वय ३०, रा. करंदी) यांचे विरुद्ध गुन्हे दाखल केले.

Web Title: Seven thousand rupees worth of liquor confiscated