शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

भीमा खो-यातील सात धरणात शून्य टक्के तर दहा धरणांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 1:35 PM

उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढल्याने धरणाची पाणी पातळी चांगलीच खालवत आहे....

ठळक मुद्देराज्यातील बहुतांश सर्वच जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माणकळमोडी, पवना, कासरसाई ,पानशेत आणि गुंजवणी धरणात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी मान्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनास वेळ लागणार असल्याचा अंदाज

पुणे: जिल्हा व परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या भीमा खो-यातील पंचवीसपैकी ७ धरणात शून्य टक्के तर १० धरणात दहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे भीमा खो-यातील धरणे चांगलीच तळाला गेली आहेत. मात्र, पुणे शहर परिसराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरणात ४१.७१ टक्के तर पानशेतमध्ये १८.४५ टक्के पाणीसाठा रविवारी उपलब्ध होता. त्यामुळे पुणे महापालिकेला सध्या पाण्याचा तुटवडा दिसून येत नसला तरी पाऊस लांबल्यास पुणेकरांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. राज्यातील बहुतांश सर्वच जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून विदर्भ मराठवाड्यासह,मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने होत आहे. तसेच उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढल्याने धरणाची पाणी पातळी चांगलीच खालवत आहे. काही भागात दुष्काळाची परिस्थिती भीषण झाली असून अनेक भागात नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.भीमा खो-यातील पिंपळगाव जोगे, वडज, डिंभे, घोड, टेमघर, नाझरे आणि उजनी धरणात शून्य टक्के पाणीसाठा असून माणिकडोह, येडगाव, विसापूर,चासकमान,भामा आसखेड,मुळशी, निरा- देवधर, भाटघर, वीर या दहा धरणात दहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर कळमोडी, पवना, कासरसाई ,पानशेत आणि गुंजवणी धरणात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. त्यातच मान्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनास वेळ लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता चांगलीच जाणवणार आहे,असे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे. ---------------------------भीमा खो-यातील धरणांची पाणीसाठ्याची टक्केवारी      धरण             टक्केवारी     पिंपळगाव जोगे   ०.००   माणिकडोह         १.२४   येडगाव              ५.२०   वडज                ०.००  डिंभे                  ०.००    घोड                ०.००    विसापूर             ३.७९कळमोडी              १८.०९ चासकमान           ३.८५   भामा आसखेड    ९.१२   वडीवळे              ३६.०६   आंद्रा                  ४१.३७  पवना                  २१.५८   कासारसाई           २०.८६मुळशी                ८.९४  टेमघर                 ०.००   वरसगाव            ८.९२  पानशेत               १८.४५   खडकवासला     ४१.७१   गुंजवणी             १३.८५   निरा देवधर         २.६७   भाटघर             ६.१६  वीर                   ०.५४  नाझरे                ०.००  उजनी             (उणे)-५१.३४    

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीdroughtदुष्काळ