शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 3:37 PM

Vinayak Raut News: राज ठाकरेंची स्मरण शक्ती कमी झाली, असे सांगत ठाकरे गटाने टीका केली आहे.

Vinayak Raut News: राज ठाकरेंनी नेहमी सारखी उद्धव ठाकरेंचा द्वेष करण्यासाठी सभा घेतली. राज ठाकरेंनी जी टीका केली त्यांनी रिफायनरी संदर्भात जर थोडी माहीती घेतली असती तर ती टीका केली नसती. रिफायनरी होणार त्या परिसरात १४ हजार वर्षांपूर्वीची कातळशिल्प आहेत, ती राज ठाकरेंनी येऊन पाहावी, असे सांगत ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी टीका केली.

राज ठाकरे ज्यांच्या बुडता जहाजाला पाठिंबा द्यायला आलात ते राणे रिफायनरीला समर्थन देणारे राणे खरे की विरोध करणारे खरे. विनायक राऊत यांचे आव्हान आहे आम्ही जर रीफायनरीच्या बाजूची एक इंच जरी जागा घेतली असेल तर ते राज ठाकरेंनी सिद्ध करून दाखवावे नाहीतर त्या गावात येऊन लोकांची माफी मागावी. कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीला समर्थन करणारे राज ठाकरे खरे, अशी विचारणा विनायक राऊतांनी केली. 

राज ठाकरेंची स्मरण शक्ती कमी झाली

राज ठाकरेंची स्मरण शक्ती कमी झाली. मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले ते देवेंद्र फडणवीस व शिंदेच्या कारकिर्दीत गेले. आम्ही शिवसेना उद्धव ठाकरेंसोबत एक निष्ठावंत राहिलो आहोत, त्यामुळे कोकणची जनता आमच्यासोबत राहील. कुडाळ एमआयडीसीतील भूखंड नारायण राणे पुरस्कृत भूमाफीयांनी अडवून ठेवले आहेत, असा आरोप विनायक राऊतांनी केला.

दरम्यान, शिवसेनेत नारायण राणे होते तेव्हा ते विकास काम करत होते मात्र आता ते काय दिवे लावतायत? एमएसएमई खात्याचे खरे लाभार्थी नारायण राणे आहेत. राणेंच्या मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांची लूट होते आहे. सात तारीखला दुपारी अपप्रवृत्ती गाडली जाईल, असा हल्लाबोल विनायक राऊतांनी केला. 

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Narayan Raneनारायण राणे Narayan Raneनारायण राणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMahayutiमहायुतीbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Lok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्स