शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

सात एकर ऊस खाक

By admin | Updated: August 31, 2015 03:46 IST

मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे मेन लाईनच्या तारा तुटून सहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या आगीमध्ये मांडवगण फराटा

मांडवगण फराटा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे मेन लाईनच्या तारा तुटून सहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या आगीमध्ये मांडवगण फराटा येथील शेतकरी लक्ष्मण किसनराव दरेकर, काशिनाथ किसनराव दरेकर, सुभाष उद्धव दरेकर यांचा प्रत्येकी २ एकर याप्रमाणे एकूण सहा एकर ऊस जळून खाक झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून या भागात शॉर्ट सर्किट होऊन ऊस जळण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे. महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शेतामध्ये महावितरण कंपनीने उभे केलेले खांब वाकलेल्या अवस्थेत असल्याने दोन खांबांमधील तारा लोंबकळल्यामुळे हवेच्या प्रवाहाने या तारा एकमेकींना घर्षण होऊन मोठ्या प्रमाणावर ज्वाला उसाच्या शेतात पडल्याने ऊस जळण्याचे प्रमाण वाढले आहे. लवकरात लवकर या तारा ओढून घ्याव्यात, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. अगोदरच उसाच्या बाजारभावाची शासन हमी देत नाही. त्यात आलेले पीक डोळ््यासमोर वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे जळल्याने येथील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. महावितरण कपंनीने उसाची भरपाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. जळालेल्या उसाचा पंचनामा महावितरण व महसूल विभागाने घटनास्थळी येऊन केला आहे.