शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या व्यथा पाहून गणेशभक्त भावुक

By admin | Updated: September 29, 2015 01:53 IST

डीजे अन् ढोल-ताशाच्या दणदणाटाने बधिर झालेले गणेशभक्तांचे कान मिरवणुकीत शेतकऱ्यांची व्यथा ऐकून सुन्न झाले. दुष्काळ आण सावकारी कर्जाने खचून गेलेल्या शेतकऱ्यांची

पुणे : डीजे अन् ढोल-ताशाच्या दणदणाटाने बधिर झालेले गणेशभक्तांचे कान मिरवणुकीत शेतकऱ्यांची व्यथा ऐकून सुन्न झाले. दुष्काळ आण सावकारी कर्जाने खचून गेलेल्या शेतकऱ्यांची ही व्यथा शिवदर्शन मित्र मंडळाने जिवंत देखाव्याच्या माध्यमातून समोर आणली. टिळक रस्त्यावर हा एकमेव जिवंत देखावा ठरला. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत अनेक मंडळे जिवंत देखावे सादर करतात. मात्र, विसर्जन मिरवणुकीत बहुतेक मंडळे विद्युत रोषणाई किंवा कृत्रिम देखावेच करतात. शिवदर्शन मंडळाने मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा ज्वलंत विषय देखाव्याच्या माध्यमातून गणेशभक्तांसमोर मांडला. देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत होती. सिंहगड रस्त्यावरील एस. के. डान्स अ‍ॅकॅडमीच्या सुमारे १५ कलाकारांनी साकारलेल्या या देखाव्याने सर्वांनाच भावुक केले. ‘एक गरीब शेतकरी पत्नी व एका मुलीसोबत राहत असतो. पण, दुष्काळामुळे पीक वाया गेल्याने आर्थिक स्थिती बिकट झालेली. त्यातच डोक्यावर सावकाराचे कर्ज. त्यामुळे हा शेतकरी एकदमच खचून जातो,’ असे यामध्ये दाखविण्यात आले. शेतकऱ्याची ही व्यथा ‘देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी...’ या गाण्यावर नृत्याच्या माध्यमातून सादर करण्यात आली. त्याला उपस्थितांनी टाळ््या वाजवत उत्स्फूर्त दाद दिली. सावकार आपल्या कर्जाची वसुली करण्यासाठी शेतकऱ्याला बेदम मारहाण करतो. त्यामुळे त्याच्या मनात आत्महत्येचा विचार घोंगावू लागतो. अखेर तो शेतकरी गळफास घेऊन जीवन संपवितो. त्यानंतर त्याची पत्नी व मुलीची झालेली परवड पाहून सर्व उपस्थित सुन्न होऊन जातात. देखाव्यातील काही प्रसंग मन हेलावणारे होते. हे दृश्य पाहून काही महिलांचे डोळे भरून आले. शेवटी ‘हेच का आपल्या अन्नदात्याचे भाग्य?’ असा फलक दाखवून आणि शेतकऱ्यांची अवस्था सांगून या देखाव्याचा शेवट होतो. यातील सर्वच कलाकारांचा अभिनय वाखाणण्याजोगा होता. विशेषत: शेतकऱ्याची भूमिका केलेला तरुण सर्वांच्याच लक्षात राहिला. (प्रतिनिधी)