शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

पीएमपीच्या प्रवाशांची सुरक्षितता अन् बसही खिळखिळी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 5:57 PM

सर्वसामान्य प्रवासी मात्र कोणताही पर्याय नसल्याने खिळखिळ्या पीएमपीवर भरवसा ठेवत दैनंदिन प्रवास करत आहेत.. 

ठळक मुद्देपुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)सह दोन्ही महापालिकांचे दुर्लक्ष होत कोणताही पर्याय नसल्याने खिळखिळ्या पीएमपीवर भरवसा ठेवत दैनंदिन प्रवासजुन्या बसप्रमाणेच काही महिन्यांपुर्वी दाखल झालेल्या अनेक नवीन बसच्या स्वयंचलित यंत्रणा बंद देखभाल-दुरूस्तीच्या अभावामागे पैशांची चणचण हेही कारणभाडेतत्वावरील बसच्या देखभाल-दुरूस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित

पुणे : बस पेटणे, चाक निखळणे, स्वयंचलित दरवाजे तुटलेले, काचा नसलेल्या खिडक्या, आसने फाटलेली, उचकटलेले पत्रे... अशा एक ना अनेक तक्रारींचा दररोज पाऊस पडत आहे. या खिळखिळ्या झालेल्या बसमुळे प्रवाशांची सुरक्षितताही खिळखिळी झाली आहे. याकडे पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)सह दोन्ही महापालिकांचे दुर्लक्ष होत आहे. पुढील काही महिन्यांत ताफ्यात दाखल होणाऱ्या नवीन बसकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वसामान्य प्रवासी मात्र कोणताही पर्याय नसल्याने खिळखिळ्या पीएमपीवर भरवसा ठेवत दैनंदिन प्रवास करत आहेत. काही दिवसांपुर्वी वारजे येथे बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने बस रस्त्यावरून खड्डयात कोसळली. शिवाजीनगर येथील कॉलेज आॅफ इंजिनिअरींगसमोरील उड्डाणपुलावर बस पेटल्याची घटना घडली. त्यानंतर एका बसच्या मागील चाक केवळ चार नट-बोल्टच्या आधारावर धावत असल्याचे दिसून आले. तर शुक्रवारी डेंगळे पुलाजवळ बसचे पुढील चाकच निखळले. या घटना अलीकडच्या काही दिवसांतील असून यापुर्वीही असे प्रकार अनेकदा घडले आहेत. या घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, वारजे येथील घटनेत काही प्रवाशांना दुखापती झाल्या. प्रत्येक घटनेनंतर देखभाल-दुरूस्तीचा मुद्दा चर्चेला येतो. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा अशीच एखादी घटना घडते. मागील अनेक वर्षांपासून हे सातत्याने सुरू आहे. 

पीएमपी प्रशासनाकडून जुन्या बसकडे बोट दाखविले जाते. जोपर्यंत नवीन बस येणार नाहीत, तोपर्यंत जुन्या बस मार्गावर सोडाव्याच लागणार आहेत. अन्यथा बसचे वेळापत्रक कोलमडून जाईल, असा दावा प्रशासनाकडून केला जातो. तसेच भाडेतत्वावरील बसच्या देखभाल-दुरूस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. मात्र, त्यांच्यावर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची ठोर कारवाई करण्यात आलेली नाही. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेली कारवाईही थांबविण्यात आली आहे. जुन्या बसप्रमाणेच काही महिन्यांपुर्वी दाखल झालेल्या अनेक नवीन बसच्या स्वयंचलित यंत्रणा बंद आहेत. त्यामुळे देखभाल-दुरूस्तीचा अभाव व निष्काळजीपणामुळे बस खिळखिळ््या होत चालल्या आहेत. त्यातून लाखो प्रवाशांना वेठीस धरले जात असून त्यांची सुरक्षितता रामभरोसे आहे. --------------------‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये अनेक बसमधील आसने फाटलेली दिसून आली. काही ठिकाणी बसण्यासाठी आसनच नाही. काही बसमध्ये पत्रे उचकटले आहेत. खिडक्यांना काचा नाहीत. त्यामुळे प्रवाशांना धोकादायक पध्दतीने प्रवास करावा लागत आहे. काही बसमध्ये आसनांमधून खिळे बाहेर आले होते. त्यामुळे अनेकवेळा कपडे फाटल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. काही बसच्या सायलेंसरमधून धुराचे लोट निघत होते. त्याचा बसमधील प्रवाशांबरोबरच रस्त्यावरील वाहनचालकांनीही त्रास होत होता. बहुतेक बसचे स्वयंचलित दरवाजे बंद होते. हे दरवाजे दोरीच्या सहाय्याने बांधुने ठेवले होते. काही बसमध्ये दरवाजांना सिमेंटचे ब्लॉक लावल्याचे दिसले.
...............पैशांची चणचणदेखभाल-दुरूस्तीच्या अभावामागे पैशांची चणचण हेही कारण आहे. पीएमपीच्या उत्पन्न कमी झाल्याने दैनंदिन खर्च भागविणे कठीण जाऊ लागले आहे. त्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांचे वेतनही वेळेवर होत नाही. बसच्या दुरूस्तीसाठी आवश्यक सुट्टे भाग घेण्यासाठी कंपन्यांची देणी वेळेवर देता येत नाहीत. त्यामुळे जुन्या साहित्यावरच काही वेळा काम करावे लागते. त्यातून ब्रेकडाऊन व अन्य घटना घडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.................ठेकेदारांवर नाही नियंत्रण पीएमपी प्रशासनाने ठेकेदारांना बसची देखभाल-दुरुस्तीबाबत काळजी घेण्याची सक्त ताकीद दिली आहे. मात्र, त्यानंतरही या बसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी झालेले नाही. शुक्रवारी चाक निखळलेली बसही भाडेतत्वावरील होती. बसचा वेग कमी असल्याने प्रवाशांना दुखापत झाली नाही. पण त्यामुळे या घटनेचे गांभीर्य कमी होत नाही. ठेकेदारांकडील बसच्या देखभाल-दुरूस्तीवर पीएमपीचे नियंत्रण नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे पीएमपीतील अधिकारील कबुल करत आहेत.बस च्या काचा फुटलेल्या असतात. दरवाजे खराब आहेत. सीट चांगल्या नसतात. चालक धूम्रपान करून बसमध्येच  थुंकतात. त्याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. - सुभद्रा माने, प्रवासी--------------मी दररोज बसने प्रवास करत असल्याने खिळखिळ्या बसचा रोजच अनुभव घेतो. दुसरा पर्याय नसल्याने या बसमधून प्रवास करणे अपरिहार्य आहे. प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेकडेही लक्ष द्यायला हवे.- प्रशांत चोपडे................

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल