शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मुळशीत येतेय कोरोनाची दुसरी लाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पिरंगुट : पुण्याप्रमाणेच मुळशी तालुक्याही कोरोनाची दुसरी लाट हळूहळू पसरत असून बावधन, भूगाव, भुकूम, सूस, हिंजवडी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पिरंगुट : पुण्याप्रमाणेच मुळशी तालुक्याही कोरोनाची दुसरी लाट हळूहळू पसरत असून बावधन, भूगाव, भुकूम, सूस, हिंजवडी, बावधन, माण गावात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. तर आता दोन दिवसांमध्ये तब्बल १९ कोरोनाबाधित रुग्णदेखील आढळून आल्याने मुळशीकरांच्या चिंतेमध्ये मोठी वाढ झाली आहे.

मुळशीतील १३ गावे कोरोनाग्रस्त असून ५१ पेक्षा अधिक जण उपचार घेत आहेत. डिसेंबरपूर्वी मुळशीतील ७१ गावे कोरानाग्रस्त झाली होती. जानेवारीनंतरच्या दुसऱ्या लाटेत १३ गावात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. आयटीनगरीतील मारुंजी, माण, हिंजवडीत कोरोना वेगाने पसरत असून २० पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास गावे लॉकडाऊन करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

मास्क न वापरल्यास कारवाईचे आदेश सर्व गावांना देण्यात आले आहेत. यानुसार मारूंजी, माण, हिंजवडी, बावधनसह अनेक गावांत शनिवारी ग्रामपंचायतीने थेट कारवाई केली आहे. मास्क न घातल्यास ५०० रुपयांचा दंड हा शनिवारी १०० पेक्षा अधिक ग्रामस्थ व दुकानदारांकडून घेण्यात आला.

याबाबत गट विकास अधिकारी संदीप जठार यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना सतर्क रहाण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना अधिक पसरू नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहनही जठार यांनी केले आहे.

मुळशीत आतापर्यंत एकूण ४७९० पेक्षा अधिक रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. दुसऱ्या लाटेत १३ गावातील ५१ रुग्ण कोरोनाबाधित आहे. पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्ण ७७६ रूग्ण हिंजवडीत सापडले होते. त्यापाठोपाठ पिरंगुट ५२८ रुग्ण, भूगाव ४४५, माण ३३०, मारूंजी २४८, सूस ३५७, माण ३३०, बावधन २८५ अशी चिंताजनक स्थिती होती. आता पुन्हा याच गावात कोरोनाचा उद्रेक पाहण्यास मिळत आहे.

या सर्व पार्श्‍वभूमीवर ती हॉटेल, मंगल कार्यालयातील गर्दीवर पोलीस प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. मुळशीतील हॉटेल व मंगल कार्यालयांना ५० पेक्षा कमी लोक असतील, नाहीतर कारवाई केली जाईल, असा आदेशही पोलिसांनी दिला आहे. हॉटेल व मंगल कार्यालय मालकांच्या बैठका घेऊन त्यांना कोरोनाबाबतची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यास सांगितले आहे.

- मुळशी तालुक्यामध्ये मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून पाचशे रुपयाचा दंड वसूल करतेप्रसंगी