मतदारांची नावे होणार सर्च

By Admin | Updated: June 12, 2014 05:03 IST2014-06-12T05:03:24+5:302014-06-12T05:03:24+5:30

विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने विभागीय स्तरावर सर्च इंजिन उपलब्ध करून दिले

Search for names of voters | मतदारांची नावे होणार सर्च

मतदारांची नावे होणार सर्च

पुणे : विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने विभागीय स्तरावर सर्च इंजिन उपलब्ध करून दिले असल्याने मतदारांना नाव शोधणे सोपे होणार आहे. ६६६.८िीिङ्मस्र४ल्ली.ूङ्मे या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
मतदारयादीत नावे शोधण्याची सुविधा फक्त निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. निवडणुकीच्या काळात मतदारयादीतील नाव न सापडल्याने नागरिकांनी संकेतस्थळावर नाव शोधण्याची मोहीम सरु केली होती. एकाच वेळी अनेकांनी संकेतस्थळावर संपर्क साधल्याने आयोगाचे संकेतस्थळ काम करेनासे
झाले होते.
या गोंधळाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आयोगाने जिल्हास्तरावर सर्च इंजिन सुरू करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी राव यांनी केली होती. यावर आयोगाने शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या यादीतील नाव शोधण्याची सुविधा विभागीय स्तरावर उपलब्ध करून दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Search for names of voters