स्कार्फ आणि केस धान्यभरड यंत्रात अडकले; गंभीर जखमी होऊन महिलेचा मृत्यू, भोर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:34 IST2026-02-24T15:29:13+5:302026-02-24T15:34:13+5:30
महिला कुटुंबीयांसमवेत शेतात धान्य भरडत असताना डोक्यावरील स्कार्फ आणि केस यंत्रात अडकले, त्यामुळे त्या यंत्रात ओढल्या गेल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला

स्कार्फ आणि केस धान्यभरड यंत्रात अडकले; गंभीर जखमी होऊन महिलेचा मृत्यू, भोर तालुक्यातील घटना
नसरापूर: कुरंगवडी (ता. भोर) येथे शेतात वाटाणा-मसूर भरडताना डोक्यावरील स्कार्फ यंत्रात अडकल्याने शुभांगी नीलेश राऊत (वय वर्षे ४१) या महिलेचा यंत्रात ओढले जाऊन मृत्यू झाला. शनिवारी २१ तारखेला हि घटना घडली.
सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्याच दिवशी
त्यांचा वाढदिवस होता.
शुभांगी राऊत कुटुंबीयांसमवेत शेतात धान्य भरडत होत्या. तेवढ्यात डोक्यावरील स्कार्फ आणि केस यंत्रात अडकले, त्यामुळे त्या यंत्रात ओढल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तात्काळ नसरापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.माजी सैनिक रमेश राऊत यांच्या सूनबाई आणि निवृत्त सैनिक नीलेश राऊत यांच्या पत्नी असलेल्या शुभांगींना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. राजगड पोलिस ठाण्यात पोलिस पाटील नरेश शिळीमकर यांनी माहिती दिली. नातेवाईक जयेंद्र सुरेश राऊत यांच्या खबरी जबाबानुसार मृत्यूची नोंद झाली असून, पुढील तपास पोलिस हवालदार मंगेश कुंभार करत आहेत.