शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

'क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी' रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान आणखी उंचावली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 9:31 PM

मागील दोन वर्षात ५९१ ते ६०० शैक्षणिक संस्थांमध्ये; विद्यापीठ २०० अंकाने वरच्या क्रमवारीत

पुणे: जागतिक पातळीवरील शैक्षणिक संस्थांच्या 'क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२२' मध्ये सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ आता ६५० ते ७०० च्या क्रमवारीतून ५९१ ते ६०० च्या क्रमवारीत पोहोचले आहे. यंदाच्या वर्षीची क्रमवारी बुधवारी (दि.९) जून रोजी जाहीर झाली. जगभरातील १ हजार ३०० शिक्षण संस्थांनी यामध्ये सहभाग नोंदवला असून यामध्ये भारतातील ३५ शिक्षण संस्थांची निवड झाली आहे.त्यात आयआयटी संस्थांचाही यात समावेश आहे.

'क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग' ही जागतिक पातळीवर अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणारी क्रमवारी ( रँकिंग)असून गेली काही वर्षे सातत्याने या जागतिक क्रमवारीतील नामांकित संस्थांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा  समावेश होत आहे. 

नुकतीच 'टाईम्स हायर एज्युकेशन एशिया रँकिंग' जाहीर झाली होती. त्यातही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिल्या दोनशे शैक्षणिक संस्थेच्या क्रमवारीत स्थान मिळवले आहे. त्यातच आता जागतिक स्तरावरही पहिल्या ६०० च्या आत आल्याने पुणे विद्यापीठाची मान आणखी उंचावली आहे.---------२०२० मध्ये विद्यापीठ ८०० च्या क्रमवारीत होते. मागील दोन वर्षात विद्यपीठ २०० क्रमाने वर आले असून एक प्रतिष्ठित विद्यापीठ म्हणून नावारूपाला येण्याचा बहुमान विद्यापीठाने मिळवला आहे. या रँकिंग मुळे 'इन्स्टिट्युशन ऑफ एमिनन्स' साठीची विद्यापीठाची दावेदारी अधिक प्रबळ झाली आहे.- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ---------

यावर्षी विद्यापीठ रॅंकिंग मध्ये १०० क्रमाने वर पोहोचलो असून याचा नक्कीच आनंद आहे. मात्र, याहूनही प्रचंड सामर्थ्य आपल्याकडे आहे. आताच्या नव्या शैक्षणिक धोरणात आपण अनेक गोष्टींची पुनर्बांधणी केली आहे. 'मल्टी डिसीप्लीनरी रिसर्च' च्या निकषात आपण सहभागी झालो तर अधिक वरच्या क्रमवारीत आपण येऊ शकतो. तरीही या मिळालेल्या क्रमावरीचा मनस्वी आनंद आहे. यात विद्यापीठातील ज्या सहकाऱ्यांनी यामध्ये योगदान दिले त्या सर्वांचे अभिनंदन.- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठnitin karmalkarनितीन करमळकरEducationशिक्षणuniversityविद्यापीठ