तिरासारखं आमच्या युवानलाही वाचवा : पुण्यातल्या रामटेककर दांपत्याची आर्तहाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 21:14 IST2021-03-05T21:11:31+5:302021-03-05T21:14:01+5:30
तिरा कामत नावाच्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुरडीलाही हाच आजार होता. तिलाही या सोळा कोटींच्या औषधाची गरज होती...

तिरासारखं आमच्या युवानलाही वाचवा : पुण्यातल्या रामटेककर दांपत्याची आर्तहाक
पुणे: तिरा कामत या बाळाच्या पालकांनी क्राउड फंडिंगचं अपील केलं आणि त्यानंतर जगभरातून लोकांनी पुढे येत तिचा जीव वाचवायला प्रयत्न केला. अशीच मदत आमच्याही युवान बाळासाठी करा, अशी हाक पुण्यातल्या रामटेककर कुटुंबीयांनी केला आहे.
रुपाली रामटेककर यांचा एकुलता एक मुलगा युवान एक दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. बाळाच्या उपचारासाठी सोळा कोटी रुपयांची गरज आहे. आता नागरिकांनी पुढाकार घेऊन या चिमुकल्यासाठी आर्थिक मदत करावी अशी विनंती रुपाली यांनी केली आहे.
एसएमए टाईप १ हा आजार बरा करण्यासाठी खर्च सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेरचा आहे. हाच स्पायनल मस्क्युलर एट्रोफी प्रकारचा अतिदुर्मिळ आजार युवान झाला आहे. या आजारासाठी झोलजेंस्मा नावाचे इंजेक्शन उपलब्ध आहे. परंतु हे अमेरिकेवरुन मागवावे लागते. त्या एका इंजेक्शनचा खर्च सोळा कोटी रुपये आहे.
तिरा कामत नावाच्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुरडीलाही हाच आजार होता. तिलाही या सोळा कोटींच्या औषधाची गरज होती. देशभरातून तिला लवकर औषध मिळावे अशी प्रार्थना केली जात होती. देशवासी, डॉक्टर आणि केंद्र सरकारच्या मदतीने तिराला अखेर सोळा कोटींचे औषध मिळाले.
डॉक्टर युवानला बरे होण्याची पूर्णपणे खात्री देत आहेत. सद्यस्थितीत युवान दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्याच्याही उपचारासाठी एकूण १६ कोटी इतका खर्च येणार आहे. उपचाराची रक्कम खूप मोठी असल्याने आम्ही सर्वाकडून मदत घेत आहोत. असे युवानच्या आईने सांगितले आहे.
नागरिकांनी मदत करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा. https://www.impactguru.com/fundraiser/help-baby-yuvaan
ही मदत इंडियन टॅक्स बेनिफिटसाठी पात्र आहे.