शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

सासवड कृषी प्रदर्शनाच्या हिशेबासाठी सदस्यांचे उपोषण

By admin | Updated: March 20, 2015 23:07 IST

पुरंदर तालुक्यात सासवड येथे झालेल्या कृषी आणि पशुसंवर्धनच्या प्रदर्शनात मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करीत त्याचे आॅडिट करा,

पुणे : पुरंदर तालुक्यात सासवड येथे झालेल्या कृषी आणि पशुसंवर्धनच्या प्रदर्शनात मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करीत त्याचे आॅडिट करा, अशी मागणी करीत शुक्रवारी सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व विरोधीपक्ष सदस्य जिल्हा परिषदेच्या गेटवर उपोषणाला बसले. प्रदर्शनाच्या निधीचा भ्रष्टाचार करणा-यांवर कारवाई केल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा पवीत्रा सदस्यांनी घेतला. यावर अध्यक्ष प्रदीप कंद यांनी स्व:ता सदस्यांनी मनधारणा करुन संबंधित प्रकरणाची चौकशी करुन एका महिन्याचा आता अहवाल सादर करण्याचे अश्वासन दिले. जिल्हा परिषतर्फे भरविण्यात येणारे कृषी व पशु प्रदर्शन यंदा पुरंदर तालुक्यात सासवड येथे भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात सुमारे ४५० स्टॉल लावण्यात आले होते. प्रदर्शनासाठी एकूण सुमारे १७ लाखांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले. यासाठी कृषी विभागातर्फे ३ लाख, पशु संवर्धन विभागाने १०, तर पुणे जिल्हा बँकेतर्फे २ लाख रुपये देण्यात आले होते. तसेच प्रदर्शनाताली प्रत्येक स्टॉलकडून १५ हजार रुपये वसूल करण्याता आल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे . या सर्व रकमेचे आॅडिट करा, अशी मागणी करत सर्व विरोधी पक्ष सदस्यांनी उपोषण केले. यामध्ये जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्या आशा बुचके, कॉग्रेसच्या गटनेत्या ऋतुजा पाटील, स्वाती टकले, माऊली खंडागळे,नयना डोके, कुलदीप कोंडे यांच्यासह मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबाराजे जाधव उपस्थित होते.