शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कुरवंडी घाटात सराईत गुंडाचा खून

By admin | Updated: March 21, 2015 23:08 IST

घोडेगावजवळील कुरवंडी घाटात राजगुरूनगर येथील सराईत गुंड महेश अनंत भागवत (वय ३८) याचा अज्ञातांनी शुक्रवारी (दि. २०) रात्री ९ च्या सुमारास खून केला.

घोडेगाव : घोडेगावजवळील कुरवंडी घाटात राजगुरूनगर येथील सराईत गुंड महेश अनंत भागवत (वय ३८) याचा अज्ञातांनी शुक्रवारी (दि. २०) रात्री ९ च्या सुमारास खून केला. टोळी युध्दातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे. त्याच्या भावावरही खूनी हल्ला करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार : कोटमदरा गावच्या हद्दीत कुरवंडी घाटात रात्री ९ च्या सुमारास रक्ताच्या थारोळयात एक जण पडला असल्याचे गिरवली येथील सुनील अभंग यांनी पोलिसांना खबर दिली. घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. बहुतेक घाटात अपघात घडला असावा, असा संशय त्यांना जाताना वाटले.घटनास्थळी गिरीश दिघावकर व त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांनी पाहणी केली असता धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केल्याचे व तो जाग्यावरच मृत असल्याचे त्यांना आढळून आले. या घटनेची माहिती घेत असतानाच मंचर पोलीास ठाण्यामधून पोलीस हवालदार युवराज भोजणे यांनी पेठ कुरवंडी घोडेगाव रस्त्यावर कोल्हारवाडी फाट्याजवळ एका दुचाकीला (एमएच १४/७७७१) अपघात झाला असून याच्या जवळपास एक सत्तूर, एक चॉपर, एक तलवार, एक लाकडी दांडा, एक मोबाईल व चपलांचा जोड असल्याचे घोडेगाव पोलिसांना सांगितले. या माहितीवरून मंचर व घोडेगाव पोलिसांनी आरोपींचा माग घेण्याचा प्रयत्न केला; परंतु कोणी हाती लागले नाही. या ठिकाणी सापडलेल्या सर्व हत्यारांवर रक्त लागलेले होते. ४दरम्यान, घटनास्थळी पंचनामा करून मृताचा मृतदेह घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. त्याच्या छाती, गळा, तोंडावर धारदार शस्त्रांनी मोठ्या प्रमाणावर वर केले होते. त्यामुळे चेहरा ओळखू येत नव्हता. तो मृत राजगुरूनगर येथील असावा, असा संशय पोलिसांना आला. ४यावरून राजगुरूनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना बोलाविण्यात आले. त्यांनी महेश भागवत असल्याचा प्राथमिक अंदाज लावला. पोलिसांनी त्याचे वडील व बायको त्यांना ओळख पटविण्यासाठी बोलावले असता त्यांनी हा महेश असल्याचे सांगितले. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांच्यासह एस. एम. हांडे करीत आहेत.