शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वरभास्करा’ला सप्तसुरांनी सुमनांजली

By admin | Updated: January 23, 2017 03:17 IST

‘स्वरभास्करा’ला दिलेली सप्तसुरांची सुमनांजली... बहारदार गायन आणि कानाला तृप्त करणारी वादनाची अद्वितीय जुगलबंदी

पुणे : ‘स्वरभास्करा’ला दिलेली सप्तसुरांची सुमनांजली... बहारदार गायन आणि कानाला तृप्त करणारी वादनाची अद्वितीय जुगलबंदी... अशा बहारदार मैफलीतून रविवारी ‘संगत संगीत’ महोत्सवातील सकाळचे सत्र रंगले. पंडितजींच्या एरवी कधीही ऐकायला न मिळणाऱ्या गायन-वादनाच्या सुरेल सादरीकरणातून रसिकांची पहाट ‘स्वरमयी’ झाली.पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ‘संगत संगीत’ महोत्सवाचे हे सत्र ‘स्वरभास्करा’ला समर्पित करण्यात आले. पंडितजींचे पुत्र आणि शिष्य श्रीनिवास जोशी यांच्या गायनाने सत्राला प्रारंभ झाला. त्यांना संवादिनीवर अविनाश दिघे यांनी तर तबल्यावर महेश देसाई यांनी साथसंगत केली.उपेंद्र भट यांनी ‘कोमल रिषभ आसावरी’ या अनवट रागाने मैफलीला प्रारंभ केला. ‘सब मेरा वो ही’ आणि ‘मैं तो तुमरो दास जनम जनम से’ या बंदिशीनंतर त्यांनी ‘चिरंजीव राहो जगी नाम’ ही पं. भीमसेन जोशी यांनी स्वरबद्ध केलेली आणि गायलेली रचना सादर केली. ‘अवघा आनंदी आनंद’ या भक्तिरचनेने मैफलीची सांगता केली. सवाई गंधर्व महोत्सव गाजविलेल्या लक्ष्य मोहन गुप्ता आणि आयुष मोहन गुप्ता या बंधूंनी सतार आणि सरोद सहवादनातून ‘मियाँ की तोडी’ राग सादर केला. या रागाचा आलाप, जोड, धमार यातून त्यांनी रागाचे सौंदर्य उलगडले. त्यानंतर हिमांशू महंत (तबला) आणि ज्ञानेश्वर देशमुख यांची वाद्यांची जुगलबंदी रसिकांनी अनुभवली. (प्रतिनिधी)