शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास' तुकोबांच्या आगमनाने निमगाव केतकी ‘विठुमय’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 6:58 PM

'ज्ञानोबा- माऊली तुकाराम' च्या जयघोषात अन् भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे निमगाव केतकी येथे आगमन

निळकंठ भोंग

निमगाव केतकी:  'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ' अशा भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माउली तुकाराम' च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज निमगाव केतकी येथे सायंकाळी आगमन झाले. निमगाव केतकी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्रवीण डोंगरे यांनी पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत केले. स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अंतर्गत 'निर्मळ वारी हरित वारी' च्या माध्यमातून पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. तसेच प्लास्टिकमुक्त गाव, प्रदूषणमुक्त वारी, वैद्यकीय पथके पर्यावरण हरित संतुलनासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. पाणी, विज,कचरा कुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली आहे, ध्वनीक्षेपकाद्वारे  सूचनाही देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक आबा जगताप यांनी दिली.

निमगाव केतकी या ठिकाणी चौकाचौकात विविध पतसंस्था संघटना यांच्याकडून पालखी रथाचे व दिंड्याचे स्वागत करण्यासाठी स्वागत कक्ष कमानी, मंडप उभारले गेले आहेत.  काही सेवाभावी संस्थांकडून वारकºयांसाठी मोफत आरोग्य सेवा, अल्पोपहार, फळे, पाणी पुरवठा व इतर सेवा पुरविल्या. सर्व वातावरण हरी भक्तांनी गजबजून गेल्याचे चित्र होते.

...निमगाव केतकी येथे अनेक संस्था व नागरिकांकडून अन्नदान

मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर तालुका आणि इंदापूर तालुका मुस्लिम युवक संघटना यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शीरखुर्मा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमाद्वारे धार्मिक एकोप्याचा संदेश देण्यात आला. अष्टविनायक पतसंस्था, सिद्धिविनायक पतसंस्था देवराज पतसंस्था, मयुरेश्वर पतसंस्था, अष्टविनायक ग्रुप, सोपानराव चॅरिटेबल ट्रस्ट, सुवर्णयुगेश्वर पतसंस्था, केतकेश्वर पतसंस्था, सुवर्णयुग पतसंस्था, त्याचप्रमाणे कुंडलिक कचरे सुनील खामगळ मित्र परिवाराच्या वतीने हजारो वारकऱ्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली.

टॅग्स :Puneपुणेashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाAshadhi Ekadashiआषाढी एकादशी