Video: संत ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधी सोहळा थेट अमेरिकेत; युवकाने साकारला सुरेख देखावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 14:08 IST2025-09-05T14:07:04+5:302025-09-05T14:08:43+5:30
अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचा रहिवासी असलेल्या दिग्विजय जाधव या युवकाने आपल्या घरातील गणेशोत्सवात हा आळंदीतील संजीवन समाधी मंदिराचा सुरेख देखावा तयार केला

Video: संत ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधी सोहळा थेट अमेरिकेत; युवकाने साकारला सुरेख देखावा
पुणे: संत ज्ञानेश्वरांचे पसायदान थेट अमेरिकेतील कॅलिफोर्नियात पोहोचले. निमित्त अर्थातच गणेशोत्सवाचे व संजीवन समाधीच्या ७५० व्या सोहळ्याचे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचा रहिवासी असलेल्या दिग्विजय जाधव या युवकाने आपल्या घरातील गणेशोत्सवात हा आळंदीतील संजीवन समाधी मंदिराचा सुरेख देखावा तयार केला आहे.
संत ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधी सोहळा थेट अमेरिकेत; युवकाने साकारला सुरेख देखावा#pune#America#ganpatifestival#santdnyaneshwarmaharajpic.twitter.com/fB5HmNQwfN
— Lokmat (@lokmat) September 5, 2025
दिग्विजयला ही प्रेरणा त्याचे मामा व संत साहित्याचे अभ्यासक उल्हास पवार यांच्याकडून मिळाली. पवार आळंदी संस्थानचे विश्वस्त होते. त्याशिवाय संत साहित्याबद्दलची त्यांची प्रीती सर्वपरिचित आहे. त्यांच्याकडूनच आळंदीविषयी ऐकता ऐकता दिग्विजयला हा देखावा सादर करण्याची कल्पना सुचली. कॅलिफोर्नियात त्यासाठीचे साहित्य वगैरे मिळणे अडचणीचे होते, मात्र ते त्याने मिळविले. पत्नी अनघा व चिरंजीव आदिश यांचे सहकार्य घेत त्याने अगदी हुबेहूब असा संजीवन समाधी मंदिराचा देखावा परिसरातील अन्य स्थळांसह सादर केला आहे. समाधी मंदिर, आळंदीतील घाट, तेथील अजान वृक्ष व मंदिराचा परिसर त्याने या लहानशा देखाव्यातून साकार केला आहे. मामांकडून आळंदीमधील अनेक गोष्टी त्याने ऐकल्या होत्या. काही स्वत: पाहिल्या होत्या. काही गुगलवरून पाहुन घेतल्या कार्डशिट, रंग यातून जाधव कुटुंबियांनी हा देखावा तयार केला. आमच्या घराण्यात वारकरी परंपरा आहे. आळंदी, पंढरपूरची वारी आमच्या घरात आहे. वारकरी वारसा अशा पद्धतीने पुढच्या पिढीकडे पोहोचला असल्याचे समाधान मला यातून मिळाले असे उल्हास पवार यांनी सांगितले.