शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

संक्रांतीचे वाण, गरजूंसाठी ठरले दान

By admin | Updated: January 31, 2015 00:51 IST

जुन्नर येथील विद्यासंस्कार प्रतिष्ठानच्या वतीने संक्रांतीच्या औचित्याने ‘तुमचं संक्रांतीचं वाण, गरजूंसाठी ठरेल अनोखे दान’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला

लेण्याद्री : जुन्नर येथील विद्यासंस्कार प्रतिष्ठानच्या वतीने संक्रांतीच्या औचित्याने ‘तुमचं संक्रांतीचं वाण, गरजूंसाठी ठरेल अनोखे दान’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला जुन्नर तालुक्यातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सलग दुसऱ्या वर्षी राबविलेल्या या उपक्रमातून एक टेम्पोभरुन साहित्य नगर येथील ‘स्नेहालय’ या संस्थेतील गरजू मुलांसाठी सुपूर्द करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन गाडेकर यांनी दिली. उपक्रम अत्यंत स्पृहणीय असल्याची भावना स्नेहालयचे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात अनेक संस्था काम करतात. अशाही संस्थांसाठी महिलांनी हा उपक्रम राबविल्यास संक्रांतीचे हे अनोखे उपक्रमशील मॉडेल ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या उपक्रमांतर्गत जुन्नर, ओतूर, नारायणगाव येथे तिळगूळ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. तुम्ही गरजू विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त साहित्य आम्हाला द्या, असे आवाहन करण्यात आले होते. त्यातून ९० किलो तांदूळ, ४७ किलो साखर, ४९ किलो गहू, दोन हजार २२ बिस्किट पुडे, १३६ साबण, तसेच डाळी, कडधान्ये, तेल, मसाला, मुलांसाठी युनिफॉर्म, टॉवेल, कानटोप्या, दप्तरे, पेन्सिली, टूथपेस्ट, ब्रश, १,८०० आठशे पेन, १०८ पेन्सिली,चारशे वह्या, स्टीलची भांडी असे विविध प्रकारचे साहित्य जमा झाले होते. विद्यासंस्कार प्रतिष्ठानचे विश्वस्त, विद्या ग्रुपचे संचालक, शिक्षकवृंद यांनी या उपक्रमासाठी प्रयत्न केले. समाजातील अनेक लोकांना गरजूंसाठी मदत करण्याची इच्छा असते. परंतु गरजू कोण आणि त्यांच्यापर्यंत मदत कशी पोहचवायची, हा प्रश्न अनेकांना असतो. या समाजाच्या दातृत्वाला संक्रांतीचे निमित्त माध्यम बनवून जो उपक्रम विद्यासंस्कार प्रतिष्ठानने केला, तो खरोखर स्पृहणीय आहे, अशी प्रतिक्रिया महिला बचत गटांचे कार्य करणाऱ्या राजश्री बोरकर यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)