सांगवी-डोर्लेवाडी गटात चुरस वाढणार

By Admin | Updated: January 23, 2017 02:35 IST2017-01-23T02:35:27+5:302017-01-23T02:35:27+5:30

डोर्लेवाडी-सांगवी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या गटामध्ये अनेक मोठी समीकरणे

Sangvi-Dornlewadi group will grow fiercely | सांगवी-डोर्लेवाडी गटात चुरस वाढणार

सांगवी-डोर्लेवाडी गटात चुरस वाढणार

काटेवाडी : डोर्लेवाडी-सांगवी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या गटामध्ये अनेक मोठी समीकरणे तयार होत आहेत. पूर्वी हा गट गुणवडी-निरावागज हा गट अस्तित्वात होता. येथून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विश्वास देवकाते हे राष्ट्रवादीकडून निवडून आले. हा गट-गण आजी-माजी सभापतींचा आहे. पुनर्रचनेमध्ये या गटामध्ये सांगवी, शिरवली, कांबळेश्वर या गावांचा नव्याने समावेश झाला असल्यामुळे या गटामध्ये चुरस निर्माण होणार आहे.
हा गट महिला सर्वसाधारण झाला आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला गट महायुतीच्या नेत्यांनीदेखील निवडणुकीसाठी मोठी तयारी केली आहे. भाजपा महायुतीचे सरकार या राज्यामध्ये असल्यामुळे भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विरोधी गटामध्ये भाजपाचे चंद्रराव तावरे, माळेगावचे संचालक विलासराव देवकाते, माळेगाव कारखान्याचे चेअरमन रंजन तावरे, बापूराव सोनवलकर, प्रदेश युवा मोर्चा चिटणीस अभिजित देवकाते, संजय गांधी निराधार योजनेचे राहुल तावरे, माळेगावचे संचालक अविनाश देवकाते, माळेगावचे उपाध्यक्ष रामदास अटोळे, भाजपाचे सरचिटणीस भारत देवकाते, रासपचे जिल्हा अध्यक्ष संदीप चोपडे, बाळासाहेब कोळेकर, महेंद्र तावरे अशी मोठी फळी आहे. तर राष्ट्रवादीकडे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विश्वासराव देवकाते, मदनराव देवकाते, निरावागजचे माजी सरपंच संजय देवकाते, पंचायत समितीचे सभापती करण खलाटे, किरण तावरे, अशोक नवले, पोपटराव झारगड, कुंदन देवकाते, गुलाबराव देवकाते, ‘छत्रपती’चे आजी-माजी संचालकांची फळी राष्ट्रवादीकडे आहे. जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादीकडून निरावागजचे माजी सरपंच संजय देवकाते यांच्या पत्नी वंदना देवकाते, राष्ट्रवादी युवक काँग्रेस माजी अध्यक्ष किरण तावरे यांच्या पत्नी मीनाक्षी तावरे, वैशाली तावरे, शिरवलीच्या अश्विनी धुमाळ, डोर्लेवाडीच्या सरपंच राधा जाधव, कल्याणी वाघमोडे इच्छुक आहेत. भाजपाच्या वतीने प्रदेश भाजपाचे सरचिटणीस अभिजित देवकाते, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष युवराज तावरे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राहुल तावरे, नीरावागजचे राजाभाऊ देवकाते यांच्या कुटुंबातील सदस्यांची चर्चा आहे. या गणामधील निवडणूकराष्ट्रवादीला सोपी राहिली नाही. या गटामध्ये माळेगाव कारखान्याचे मोठे कार्यक्षेत्र आहे. हा कारखाना अजित पवार यांच्या विरोधात असल्यामुळे येथे राष्ट्रवादीची दमछाक होणार आहे. तसेच सभापतिपदाचा उमेदवार या गणातून निवडून येणार असल्यामुळे या गट व गणात राष्ट्रवादी विरोधात प्रचाराला सरकारमधील मंत्री प्रचारला येणार आहेत. त्यामुळे या विरोधकांकडून निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, रासप, जनक्रांती आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तसेच डोर्लेवाडी गणामध्ये ढेकळवाडी, सोनगाव, झारगडवाडी, डोर्लेवाडी, मेखळी, घडगेवाडी या गावांचा समावेश आहे. येथेही चुरस निर्माण होणार आहे.
या गणातून भाजपाकडून ढेकळवाडीचे बापूराव सोलनकर, मेखळीतून रासपचे संदीप चोपडे, सोनगावचे प्रकाश देवकाते, शिवसेनेचे निखिल देवकाते, शेतकरी संघटनेचे महेंद्र तावरे तर राष्ट्रवादीकडून विठ्ठल देवकाते, रमेश मोरे, अशोक नवले, शामराव चोपडे, अविनाश भिसे, राहुल झारगड, बापू गवळी,
अविनाश काळकुटे, विकास माने इच्छुक आहेत. (वार्ताहर)

Web Title: Sangvi-Dornlewadi group will grow fiercely