वाळू माफियांना पुन्हा एकदा दणका ; चार बोटी नष्ट केल्या महसूल व पोलीस संयुक्त पथकाची कारवाई  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 20:30 IST2025-02-06T20:30:26+5:302025-02-06T20:30:47+5:30

वाळू उत्खनन करणाऱ्या चार बोटी पकडून बुडवून नष्ट

Sand mafia gets another blow; Four boats destroyed by joint team of revenue and police | वाळू माफियांना पुन्हा एकदा दणका ; चार बोटी नष्ट केल्या महसूल व पोलीस संयुक्त पथकाची कारवाई  

वाळू माफियांना पुन्हा एकदा दणका ; चार बोटी नष्ट केल्या महसूल व पोलीस संयुक्त पथकाची कारवाई  

इंदापूर : तहसीलदार जीवन बनसोडे व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या नेतृत्वाखालील महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने उजनी जलाशयातील सरडेवाडी व वनगळी या भागात पाठलाग करुन वाळू उत्खनन करणाऱ्या चार बोटी पकडून बुडवून नष्ट केल्या.

निवासी नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे, इंदापूरचे मंडलाधिकारी श्याम झोडगे,माळवाडीचे मंडलाधिकारी औदुंबर शिंदे, काटीचे मंडलाधिकारी मल्लाप्पा ढाणे,ग्राम महसूल अधिकारी अशोक पोळ, संदीप मैलागीर,प्रताप गायकवाड, राजाभाऊ पिसाळ, अमोल हजगुडे,भास्कर घोळवे,तहसील कार्यालयाचे शिपाई संग्राम बंडगर, पोलीस पाटील सुनील राऊत, प्रदीप भोई,अरुण कांबळे,विजयकुमार करे,आप्पा गायकवाड पोलीस कर्मचारी लक्ष्मण सूर्यवंशी व नंदू जाधव, जिल्हाधिकारी कार्यालय येथील ड्रोन सर्वेअर संकेत बाबर व बबलू नरळे यांनी कारवाईत भाग घेतला.

Web Title: Sand mafia gets another blow; Four boats destroyed by joint team of revenue and police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.