मार्केटयार्डात चेंबरमध्ये पडलेल्या वासराची सुखरूप सुटका
By राजू हिंगे | Updated: April 16, 2023 16:52 IST2023-04-16T16:51:58+5:302023-04-16T16:52:36+5:30
पुणे शहरामध्ये अनेक धोकादायक चेंबर

मार्केटयार्डात चेंबरमध्ये पडलेल्या वासराची सुखरूप सुटका
पुणे: मार्केट यार्डमधील उघड्या चेंबरमध्ये वासरू पडल्यामुळे काही वेळ अडकून पडले होते. परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी या वासराची सुखरूप सुटका केली. आज रविवारी (१६) सकाळी मार्केट यार्डातील गेट क्रमांक तीनजवळ एका चेंबरमध्ये वासरु पडल्याची घटना घडली.
मार्केटयार्ड, गेट क्रमांक ३ येथे एका चेंबरमध्ये वासरु पडल्याची घटना घडली.स्थानिक व्यापार आणि हा प्रकार अग्निशामक दलास कळविला. त्यावर अग्निशमन दलाचे वाहनचालक शरद गोडसे, जवान संभाजी अवताडे, सुरज कारले, तुषार जानकर, हर्षद येवले घटनास्थळी पोचले. त्यांनी दोरीच्या साह्याने वासराची पंधरा मिनिटांत सुखरुप सुटका केली.
पुणे शहरामध्ये अनेक धोकादायक चेंबर झालेली आहेत. या चेबरमध्ये यापूर्वी अनेकदा जनावरे आणि व्यक्ती पडून अपघात झाल्याच्या घटना अनेकदा घडलेल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सर्व चेंबरची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी पुणे महापालिकेकडे केली आहे.