शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पुणे शहरातील खासगी रुग्णालयातल्या लुटीवरून महापालिकेत सत्ताधारी-विरोधक भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 16:49 IST

मनसेच्या नगरसेवकांनी ओतली महापौरांसमोर औषधे

ठळक मुद्देफसवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई केली जात नसल्याची तक्रार

पुणे : खासगी रुग्णालये आणि या रुग्णालयातील मेडिकल दुकानांकडून रूग्णांची लूट सुरू असून याविषयी प्रशासन नुसत्याच नोटिसा बजावत आहे. प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केली जात नसल्याच्या मुद्द्यावरून महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या मुख्यसभेमध्ये गदारोळ झाला. यावेळी कोरोनाविषयक केलेल्या कामांवरून राज्य शासनाने उशीर केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाचे सर्व नगरसेवक आक्रमक झाले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी मेडिकल्सवर कारवाई करावी असे फलक हाती धरत महापौरांच्या आसनासमोर उभे राहून खासगी रुग्णालयांमधील मेडिकल्सवर कारवाईची मागणी केली. अनेक दिवस कारवाईची मागणी करीत असतानाही प्रशासन कारवाई करीत नाही. सर्व खासगी रुग्णालयांच्या विरोधात तक्रारी व पुरावे आहेत. रुग्णांच्या नातरवाईकांना वाढीव औषधे खरेदी करायला लावली जात आहेत. नागरिकांकडून हजारो रुपयांची बिले वसूल केली जात असल्याचे मोरे म्हणाले. हाच धागा पकडत काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी मागील तीन मुख्य सभांमध्ये हा विषय मांडूनही त्याविषयी गांभीर्याने कारवाई केली जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. रुग्णालयात ४० हजारांच्या इंजेक्शनची मागणी केली जात आहे.

कोविडची औषधे काळ्या बाजारात विकली जात आहेत. या विषयावर चर्चा घडविण्याची मागणी त्यांनी केली. शहरातील परिस्थिती नियंत्रणात नाही. पुणेकरांना त्रास होत आहे. कम्युनिटी स्प्रेड झालाय हे प्रशासन का मान्य करीत नाही असा प्रश्न उपस्थित करीत जम्बो कोविड सेंटर तीन महिन्यांपूर्वीच का उभारले नाही यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.त्यावर आक्रमक झालेल्या सभागृह नेते धीरज घाटे यांनी आम्ही नाही राज्य सरकारने उशीर केला आहे. पालिका आपले काम करीत आहे असे उत्तर दिले. या उत्तरावर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपाला धारेवर धरत स्वतःचे अपयश राज्य शासनावर खपवू नका असे सुनावले. राष्ट्रवादीच्या गटनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक सुभाष जगताप, प्रशांत जगताप, विशाल तांबे, अरविंद शिंदे आदी नगरसेवक आक्रमक होत महापौरांच्या आसनासमोर जमा झाले. 'चार महिने तुम्ही काय केले, ३०० कोटी कशावर खर्च केले हे सांगा असा सवाल विरोधी पक्षांनी केला. एकंदरीतच या विषयावर मुख्यसभेत गदारोळ झाला. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य शासन आणि पालिका या विषयावर बोलू नये तसेच केवळ पुणे आणि कोरोना या विषयावर बोलूया, वसंत मोरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलूया, तीन सभांमध्ये हा विषय सुरू आहे. सर्वांची भावना सारखीच असल्याचे सांगत प्रशासनाला चौकशीचे निर्देश दिले.----///----खासगी रुग्णालये आणि मेडिकल्सकडून देण्यात येणाऱ्या बिलांचे पूर्व लेखापरीक्षण करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. या प्रकरणांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले. तक्रारींमधील सत्य पडताळण्यासोबतच राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन होते की नाही हे तपासण्याचे सक्त निर्देश मोहोळ यांनी प्रशासला दिले

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाmedicineऔषधंhospitalहॉस्पिटलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसMNSमनसेShiv Senaशिवसेना