नीरा : पुरंदर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या जवळार्जून गावामध्ये थेट सरपंचांना बंदुकीचा धाक दाखवत धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून सरपंच सोमनाथ दत्तात्रय कणसे यांनी अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या प्रशांत रमेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मागील पाच वर्षांत ग्रामपंचायतीच्या विविध विषयांनी जवळार्जून ग्रामपंचायत चर्चेत आहे. सरपंच सोमनाथ कणसे यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न वेळोवेळी करण्यात आला आहे. कणसे यांनी ग्रामसभा घेऊन अवैधरित्या सुरू असलेला दारु अड्डा बंद करण्याची भुमिका घेतली. मात्र मस्तावलेल्या दारु व्यावसायिकाने रविवारी (दि.१६) सकाळी ११:३० च्या सुमारास सार्वजनिक कार्यक्रमांत थेट सरपंच सोमनाथ कणसे यांच्यावर हल्ला केला. कणसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जेजुरी पोलीसांनी माहिती दिल्यानुसार दारूचा धंदा बंद पाडल्याचा राग मनात धरून प्रशांत राणे याच्याकडे असणारे बेकायदेशीर पिस्टलने धाक दाखवुन शिवीगाळ करून जिव मारण्याची धमकी देवुन कणसे यांच्याकडे दोन लाख रूपयांची काही साक्षीदारांचे समक्ष मागणी केली आहे. म्हणून कणसे यांनी राणे याच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर तकार दाखल केली आहे.
या घटनेची फिर्याद सरपंच सोमनाथ कणसे यांनी सोमवारी (दि.१७) जेजुरी पोलिसांत दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश पाटील करत आहेत. राणे याला सोमवारी रात्रीच अटक करण्यात आली असून, सासवड न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती जेजुरी पोलीसांनी दिली.
Web Summary : Purandar village head received death threats, gun pointed after closing liquor den. Accused demanded ransom. Police arrested the accused; investigation ongoing.
Web Summary : पुरंदर में शराब अड्डा बंद कराने पर सरपंच को जान से मारने की धमकी मिली। आरोपी ने फिरौती मांगी। पुलिस ने गिरफ्तार किया, जांच जारी।