पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 03:39 PM2024-05-18T15:39:17+5:302024-05-18T15:39:36+5:30

भरदिवसा दुपारी १२ वाजता घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण, आरोपींचे सिसिटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

Robbery at a jewelers shop in Pune Wanwadi area The robbers fled with 300 to 400 grams of gold | पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार

पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार

पुणे : पुण्यात वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहम्मद वाडी रोड वारकर मळा येथे बी जी एफ ज्वेलर्स या ठिकाणी सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. ज्वेलर्सच्या दुकानातील ३०० ते ४०० ग्राम सोने लंपास करून हे दरोडेखोर मोटार सायकल वरून पसार झाले आहेत. भरदिवसा दुपारी १२ वाजता घडलेल्या य घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींचे सिसिटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वानवडी येथे दुपारी १२ च्या सुमारास 5 ते 7 दरोडेखोरांनी मास्क घालून दुकानात प्रवेश केला. मालक आणि कर्मचाऱ्यांना शस्त्राने धाक दाखवत सोन्याचे आणि चांदीचे दागिने असे ३०० ते ४०० ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केले. एका काळ्या रंगाच्या बगेत सर्व दागिने भरून ते पसार झाले. वानवडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे. दुकानातील सिसिटीव्ही देखील तपासण्यात येत आहे. सीसीटीव्हीत दोन दरोडे खोरांनी बंदुकीचा धाक दाखवून दुकान लुटले आहे. 

परिसरात दहशतीचे वातावरण 

पुण्यात भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापारी, नागरिक दिवसा देखील सुरक्षित नसल्याचे व्यापाऱ्यांनी पोलिसांना सांगितले आहे. या घटनेने शहरातील ज्वेलर्स दुकानांच्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी पोलिसांना या घटनेचा तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. 

Web Title: Robbery at a jewelers shop in Pune Wanwadi area The robbers fled with 300 to 400 grams of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.