शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रातील रस्ता अखेर उखडला

By admin | Updated: August 7, 2015 00:25 IST

सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून विठ्ठलवाडी ते वारजे हा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता नदीपात्रातून तयार करण्यात आला होता

पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून विठ्ठलवाडी ते वारजे हा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता नदीपात्रातून तयार करण्यात आला होता. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी) आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक नागरिकांचा विरोध मोडून काढत अखेर महापालिकेने हा रस्ता उखडण्यास सुरुवात केली. वारजे पुलाच्या बाजूने हे काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले असून, या कामास विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या ९ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वीही दोन वेळा नागरिकांनी रस्ता काढण्यास विरोध केल्याने महापालिकेस परत फिरावे लागले होते. मात्र, हा रस्ता काढण्यासाठीची मुदत आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात संपत असल्याने पालिकेकडून पोलीस बंदोबस्तात हे काम सुरू करण्यात आले आहे.महापालिकेकडून विठ्ठलवाडी ते वारजेदरम्यान नदीपात्रात ब्लूू लाइनमध्ये भराव टाकून बांधलेल्या रस्त्याला पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेत, त्याविरोधात एनजीटीकडे धाव घेतली होती. एनजीटीने हा रस्ता उखडण्याचे आदेश पालिकेला दिले होते; पण पालिकेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने एनजीटीचा निर्णय कायम ठेवत, पालिकेला रस्ता उखडण्यासाठी जादा मुदत दिली. हा रस्ता उखडण्यासाठी पालिकेने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून प्रयत्न केले होते. प्रत्येक वेळी स्थानिक नागरिकांनी पालिकेचे जेसीबी आणि अधिकाऱ्यांना रस्ता उखडण्यापासून विरोध केला होता. तर एकदा धक्काबुक्कीही झाली होती.न्यायालयाची मुदत पुढील आठवड्यात संपणार आहे. तत्पूर्वी, रस्ता उखडण्याच्या कामाला सुरुवात होणे आवश्यक असल्याने गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास पालिकेचे पथक पुन्हा नदीपात्रात दाखल झाले. या परिसरातील महिलांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पथकासमोरच ठाण मांडून रस्ता उखडू देणार नाही, असा पवित्रा घेतला. या वेळी आमदार भीमराव तापकीर यांच्यासह छत्रपती संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर गोसावी कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे सहा तासांहून अधिक काळ आंदोलक भूमिकेवर ठाम होते. कोणताच तोडगा निघत नसल्याचे लक्षात आल्यावर पालिकेचे पथ विभागप्रमुख विवेक खरवडकर घटनास्थळी दाखल झाले.