नदीला पूर, बंधाऱ्यावर अडकला तरुण; पोलिसांनी अशी केली सुटका; थरारक व्हिडिओ व्हायरल

By किरण शिंदे | Updated: June 19, 2025 21:21 IST2025-06-19T21:20:15+5:302025-06-19T21:21:06+5:30

- एक तरुण मोटरसायकलसह बंधाऱ्याच्या मध्यभागी अडकलेला दिसून आला. पाण्याचा प्रवाह झपाट्याने वाढत असताना, हा तरुण वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली.

River floods, youth stuck on embankment; Police rescue him like this; Thrilling video goes viral | नदीला पूर, बंधाऱ्यावर अडकला तरुण; पोलिसांनी अशी केली सुटका; थरारक व्हिडिओ व्हायरल

नदीला पूर, बंधाऱ्यावर अडकला तरुण; पोलिसांनी अशी केली सुटका; थरारक व्हिडिओ व्हायरल

पुणे - मुळा-मुठा नदीवरील पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याची माहिती खराडी पोलीस ठाण्यास मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक खांडेकर व त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत केशवनगरकडे जाणाऱ्या बंधाऱ्यावरील पुलाचा रस्ता बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

याचदरम्यान, एक तरुण मोटरसायकलसह बंधाऱ्याच्या मध्यभागी अडकलेला दिसून आला. पाण्याचा प्रवाह झपाट्याने वाढत असताना, हा तरुण वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली. या  तरुणाचे नाव नवाज खुर्शीद कोतवाल (वय ३८, रा. तुकाराम नगर, चंदन नगर, पुणे) असून त्याला वाचविण्यासाठी तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. 

मात्र वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन सपोनि खांडेकर, पोलीस अंमलदार दोरगे, हवालदार सय्यद, अंमलदार गायकवाड, महिला अंमलदार थोरात, मालवंडे, अंमलदार साळके व अंमलदार काळे यांनी कोणताही विचार न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून दोरीच्या सहाय्याने मानवी साखळी तयार केली. आणि या तरुणास सुरक्षितरित्या बाहेर काढले. या धाडसी कार्यामुळे नवाज खुर्शीद कोतवाल यांचे प्राण वाचले. घटनेनंतर खबरदारी म्हणून बंधाऱ्यावर जाणारा रस्ता संपूर्णतः बंद करून त्याठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

Web Title: River floods, youth stuck on embankment; Police rescue him like this; Thrilling video goes viral