गजा मारणेला 'मटण बिर्याणी खाऊ घालणाऱ्या 'राइट हँड' ला ३ दिवसांची पोलीस कोठडी

By नम्रता फडणीस | Updated: May 14, 2025 20:47 IST2025-05-14T20:46:58+5:302025-05-14T20:47:44+5:30

गुंड गजा मारणे याने ढाब्यावर मटण पार्टी केल्याच्या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी ४ पोलिसांना निलंबित केले आहे

Right hand who fed mutton biryani to Gajanan Marane gets 3 day police custody | गजा मारणेला 'मटण बिर्याणी खाऊ घालणाऱ्या 'राइट हँड' ला ३ दिवसांची पोलीस कोठडी

गजा मारणेला 'मटण बिर्याणी खाऊ घालणाऱ्या 'राइट हँड' ला ३ दिवसांची पोलीस कोठडी

पुणे: येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना गजानन मारणेला 'मटण बिर्याणी खाऊ घालणाऱ्या आणि पैसे, कपडे, बकेट व इतर वस्तुंची मदत करणा-या बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते याच्यावर पुणेपोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली असून, विशेष न्यायाधीश ( मोक्का) एस.आर साळुंखे यांनी आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

गजानन मारणेचा अत्यंत विश्वासू आणि आर्थिक व्यवहार सांभाळणारा 'राइट हँड' अशी ओळख असलेल्या बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्यानंतर पोलिसांनी बुरखा घालून त्याला बुधवारी ( दि. 15) न्यायालयात हजर केले. हा गुन्हा संवेदनशील असून, आरोपीस विश्वासात घेऊन त्याच्याकडून गुन्हयातील इतर पाहिजे आरोपींच्या ठावठिकाणाची माहिती घेऊन पाहिजे आरोपींवर कायदेशीर कार्यवाही करणे आहे. आरोपीने कुणाच्या सांगण्यावरून सातारा व सांगली येथील १५ ते २० व्यक्तींना जमा करून न्यायालयीन कोठडीतील आरोपीस आर्थिक तसेच इतर प्रकारचे सहाय्य केले आहे. याबाबत आरोपीकडे तपास करायचा आहे , त्यामुळे सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.

दरम्यान, येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना गुंड गजा मारणे याने ढाब्यावर मटण पार्टी केल्याच्या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतली आहे. याप्रकरणात् एपीआय सूरज राजगुरू, पोलिस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाणे आणि पोलिस शिपाई राहुल परदेशी यांना निलंबित केले आहे.

सांगलीत सतीश शिळीमकर याने गजा मारणेला दिले 50 हजार रुपये

बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते याचे साथीदार सतीश शिळीमकर याने गजा मारणे याला सांगली येथे 50 हजार रुपये देऊन आर्थिक मदत केली. तर विशाल धुमाळ हा कणसे ढाबा सातारा येथे पोलिस् व्हँनमध्ये मारणे याला जेवण घेऊन गेला होता. मारणे कारागृहात जाईपर्यंत त्याने सर्व व्यवस्था बघितली. त्यामुळे शिळीमकर व धुमाळ या दोघांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजा मारणेवर विविध पोलिस स्टेशनमध्ये 27 गुन्हे दाखल

गजा मारणे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर शहरासह जिल्हयातील विविध पोलिस स्टेशनमध्ये खून, अपहरण, दहशत पसरविणे आदी विविध प्रकारचे तब्बल 27 गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Right hand who fed mutton biryani to Gajanan Marane gets 3 day police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.