सराईताच्या खून प्रकरणात निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:09 IST2021-04-15T04:09:44+5:302021-04-15T04:09:44+5:30

पुणे : गुटख्याची पुडी दिली नाही म्हणून दोघांमध्ये झालेल्या मारहाणीत सराईताचा मृत्यू झाला. याप्रकरणात पोलीस दलातून निवृत्त झालेल्या एका ...

Retired police officer arrested in Saraita murder case | सराईताच्या खून प्रकरणात निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला अटक

सराईताच्या खून प्रकरणात निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला अटक

पुणे : गुटख्याची पुडी दिली नाही म्हणून दोघांमध्ये झालेल्या मारहाणीत सराईताचा मृत्यू झाला. याप्रकरणात पोलीस दलातून निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी ७ च्या सुमारास ही घटना खडकीतील बाराथे वस्ती येथे घडली.

अनंत तुळशीराम ओव्हाळ (वय ६१, रा. जुनी सांगवी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यात मनीष काळूराम भोसले (वय २२, रा. बाराथे वस्ती, खडकी) याचा खून झाला आहे. याप्रकरणी हनुमंत भोसले (वय ५८) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओव्हाळ हे पोलीस दलातून निवृत्त झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी ते बाराथे वस्तीवर दुचाकीवर चालले होते. त्यावेळी सराईत मनीष भोसले याने त्यांना अडवून गुटख्याची पुडी मागितली. त्यावेळी ओव्हाळ यांनीा पुडी नसल्याचे सांगितल्यामुळे मनीषला राग आला आणि त्याने ओव्हाळ यांना मारहाण करण्यात सुरूवात केली. त्यामुळे त्यांनी दुचाकीवरुन उतरून मनीषसोबत झटापट केली. त्यानंतर मनीष खाली पडल्यानंतर ओव्हाळांनी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे मनीषचा मृत्यू झाला.

Web Title: Retired police officer arrested in Saraita murder case