शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त पोलीस महासंचालकांच्या घरी चोरी करणाऱ्यांना हरियानातून केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:15 IST

पुणे : उंड्री येथील न्याती विंड चेंइम्स सोसायटीतील निवृत्त पोलीस महासंचालक राज खिलनानी यांच्यासह दोन घरात घरफोडी करून १ ...

पुणे : उंड्री येथील न्याती विंड चेंइम्स सोसायटीतील निवृत्त पोलीस महासंचालक राज खिलनानी यांच्यासह दोन घरात घरफोडी करून १ कोटी ३४ लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी हरियानाहून जेरबंद केले आहे. त्यांच्याबरोबरच चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफालाही अटक करण्यात आली आहे.

राजेशकुमार माहेनलाल सरोज (वय ३३), राकेशकुमार मोहनलाल सरोज (वय ३०, दोघे रा. नवी दिल्ली) आणि सराफ मदनलाल मोहनलाल कुम्हार (वय ३०, रा. राजसंमद, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कोंढवा पोलिसांनी याअगोदर मनीषकुमार ऊर्फ सौरभ मदनलाल सरोज (वय १९, रा. वसई, ठाणे) याला अटक केली होती. राजेशकुमार, राकेशकुमार आणि मनीषकुमार हे मूळचे उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील राहणारे आहेत. या तिघांनी मिळून २३ व २४ ऑगस्ट २०२० च्या दरम्यानच्या रात्री न्याती विंडचेंइम्स सोसायटीत शिरून रा. खिलनानी व नैला रिझवी यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला व दोन्ही घरातील मिळून १ कोटी ३४ लाख ९५ हजार ६४१ रुपयांचे डायमंड व सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली होती.

सीसीटीव्हीवरून कोंढवा पोलिसांनी या तिघांपैकी मनीषकुमार याला अटक केली होती. त्याचवेळी त्याच्या साथीदारांची माहिती मिळाली होती. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाना पोलिसांना या चोरट्यांविषयी माहिती कळविली होती. दरम्यान, हरियाना पोलिसांनी राजेशकुमार आणि राकेशकुमार यांना पकडल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली. त्यानंतर कोंढवा पोलिसांचे पथक तातडीने हरियानाला रवाना झाले. त्यांनी दोघांना हरियाना पोलिसांकडून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने दागिने मदनलाल कुम्हार या सराफाला विकल्याची माहिती दिली. सराफाला पोलिसांनी अटक करून ८ लाख १० हजार रुपयांची १८० ग्रॅमची सोन्याची लगड तसेच ९० हजार रुपयांची २१ ग्रॅमची लगड जप्त केली आहे. मनीषकुमार याने चोरीच्या पैशांमधून खरेदी केलेला ११ हजार रुपयांचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेली कार व घरफोडीचे साहित्य जप्त केले आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे व त्यांच्या पथकाने केली.