शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

दहावीची निकाल प्रक्रिया अडकली चर्चेतच! विद्यार्थी आणि पालकांचे शासनाच्या निर्णयाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 2:07 PM

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलवून परीक्षा घेणे अडचणीचे ठरत असल्याने सीबीएसई, आयसीएसई बोर्डाप्रमाणे राज्य मंडळाने सुद्धा इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र, या विद्यार्थ्यांचा निकाल कसा जाहीर करावा, यासंदर्भातील निर्णय प्रक्रिया केवळ चर्चेतच अडकली आहे. राज्य शासन याबाबत केव्हा व काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलवून परीक्षा घेणे अडचणीचे ठरत असल्याने सीबीएसई, आयसीएसई बोर्डाचा राज्य मंडळाने सुद्धा इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी इतर राज्यांकडून दहावीच्या निकालाबाबत कोणते सूत्र स्वीकारले जाते,याचा अभ्यास केला जाईल असल्याचे स्पष्ट केले होते. सीबीएसईने वर्षभर शाळांनी केलेल्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. परंतु,राज्य शासनाने अद्याप याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांसह शिक्षण तज्ञांच्या उपस्थितीत इयत्ता दहावीच्या निकालाबाबत बैठक घेण्यात आली. त्यानंतरही समितीच्या इतर सदस्यांच्या तीन बैठका झाल्या. त्यात इयत्ता नववीतील गुणांच्या आधारे दहावीचा निकाल प्रसिद्ध करावा. दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाचे आधारे निकाल जाहीर करावा. तसेच इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात यावी, असे पर्याय समोर आले होते. त्यातील अंतिम निश्चिती झाली नाही.मात्र, राज्य शासनाने निकालाबाबत केवळ चर्चा न करता अंतिम निर्णय घ्यावा,अशी अपेक्षा आता समितीतील सदस्यांकडूनही केली जात आहे.-------------------- वेगवेगळ्या प्रवेश पूर्व परीक्षा ? इयत्ता दहावीच्या निकालावर विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो परीक्षांना घेतल्यास प्रवेश पूर्व परीक्षेचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे. मात्र कला वाणिज्य विज्ञान या वेगवेगळ्या शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रवेश पूर्व परीक्षा घेणार का? सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्यांच्या अभ्यासक्रमानुसार प्रवेश पूर्व परीक्षेचा पर्याय देणार का? असे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे राज्य शासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याexamपरीक्षाStudentविद्यार्थीVarsha Gaikwadवर्षा गायकवाड