शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांना कारवाईस विरोध

By admin | Updated: September 22, 2014 05:44 IST

पार्किंग’च्या बाहेर रस्त्यातच उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाईसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसांना शगुन चौकातील काही व्यापारयांनी विरोध केला

पिंपरी : ‘पार्किंग’च्या बाहेर रस्त्यातच उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाईसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसांना शगुन चौकातील काही व्यापारयांनी विरोध केला. कारवाई केल्यास रस्त्यावर उतरु अशी दमबाजीची भाषा केल्याने पोलीस व व्यापारी यांच्यात वाद झाला. याप्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.रविवारी रात्री आठच्या सुमारास पिंपरी कॅम्पातील रस्त्यांवर नियमांचे उल्लंघन करुन उभ्या केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून नेहमीप्रमाणे कारवाई केली जात होती. दरम्यान, शगुन चौकातील रस्त्यावरील पार्किंगच्याबाहेर उभ्या केलेल्या एका दुचाकीला जॅमर लावण्यात आला. आपल्या दुकानासमोरील वाहनांवर कारवाई करत असल्याचे पाहून व्यापारी बाहेर आले. कारवाई करण्यास पोलिसांना विरोध केला. तरीही पोलिसांनी कारवाई सुरुच ठेवली. त्यानंतर काही व्यापारी एकत्र आले. कारवाई केल्यास रस्त्यावर उतरु अशी दमबाजीची भाषा सुरु केली. यामुळे पोलीस व व्यापारयांमध्ये वाद सुरु झाला. गर्दी वाढल्याने शगुन चौक परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. येथील तीन व्यापाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गणपती विसर्जनादिवशी एकेरी वाहतुकीमुळे रस्ता बंद असतानाही त्या रस्त्याने वाहन सोडण्याचा आग्रह एका माजी उपमहापौराने धरला. पोलिसांनी वाहन सोडण्यास नकार दिल्याने माजी उपमहापौर व त्यांचे समर्थकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला होता. (प्रतिनिधी)