शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अवैध बांधकामाबाबतचा अहवाल आठवडाभरात

By admin | Updated: January 13, 2015 05:43 IST

अनधिकृत बांधकामांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या सीताराम कुंटे समितीचा अहवाल पुढील आठ दिवसांत सादर होईल

पिंपरी : अनधिकृत बांधकामांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या सीताराम कुंटे समितीचा अहवाल पुढील आठ दिवसांत सादर होईल, अशी माहिती समितीचे सदस्य व आयुक्त राजीव जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. समितीच्या अहवालानंतर निर्णय घ्यायचा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समितीला अहवाल सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, मुदतीनंतर १२ दिवस उलटले असून अजूनही अहवाल सादर झालेला नाही. भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिकेच्या प्रलंबित प्रश्नांवर पुण्यात बैठक घेतली. त्या वेळी आमदार, पदाधिकाऱ्यांपासून, प्रशासकीय अधिकारी, आयुक्त यांनी अनधिकृत बांधकाम प्रश्नाबाबत तोडगा काढावा, निर्णय घ्यावा, असे आवाहन केले होते. दरम्यान, राज्यातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न गंभीर बनला असताना या संदर्भात धोरण ठरविणे आणि अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी काय करता येईल, यासाठी राज्य सरकारने मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली १६ प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली. पिंपरीचे आयुक्त जाधव हे सदस्य आहेत. या समितीने शहरांचा आढावा घेतला. पुण्याच्या बैठकीत कुंटे समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य निर्णय घेऊ, असे सांगून समितीला अहवाल सादर करण्यासाठी मुदत दिली होती. दरम्यान, राज्यात अनधिकृत बांधकामांमध्ये सर्वाधिक बांधकामे पिंपरी-चिंचवड शहरात असल्याने समितीने नुकतीच शहरात भेट देऊन बांधकामांची पाहणी केली. अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्याची मुदत संपली आहे. आयुक्त जाधव म्हणाले, ‘‘समितीचे कामकाज सुरू आहे. त्याबाबत अहवालासाठी अंतिम प्रक्रि या सुरू असून, पुढील आठ दिवसांत अहवाल तयार होऊन तो सादर केला जाऊ शकतो.’’(प्रतिनिधी)